रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.
हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती. या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली. इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.
या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून, सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासांत मार्ग पूर्ववत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मार्गावर बोल्डर पडल्याने इंजिन घसरले आहे. सर्व प्रवाशी डबे पूर्णतः सुरक्षित आहेत. पुढील काही तासांत वाहतूक पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.