अकोला,दि.24– आपत्ती व्यवस्थापन शोध व बचावाच्या अनुषंगाने आवश्यक तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण पोपटखेड प्रकल्प ता.अकोला येथे मंगळवार (दि.22) रोजी एक दिवशीय प्रशिक्षण संपन्न झाले. अकोट व अकोला येथे उपलब्ध असलेल्या दोन्ही बोटीव्दारे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पुरस्थितीत बचावाच्या उपाययोजना, बोटचा उपयोग, पथमोपचार इत्यादी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच उपस्थित सर्व शोध व बचाव पथक सदस्य यांचे प्रात्यशिक घेण्यात आले. यावेळी अकोटचे तहसिलदार निलेश मडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदिप साबळे, मंडळ अधिकारी नेमाडे, प्रशांत सायरे, तलाठी गोपाल वानरे, सुनील कल्ले, चव्हाण, रावणकर, सुधीर कोहचाळे, नितिन कोलटक्के आदि उपस्थित होते.