अकोला(प्रतिनिधी)- पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश जवकार यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या पाठीमागे भक्कपणे उभी राहणारी संस्था अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुखांची राज्यभर निवड करण्यात आली असून अकोला जिल्हा मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निलेश र जवकार यांची निवड करण्यात आली.जवकार हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलची जिल्हा समनव्यक पदाची जबाबदारी त्यांच्या कडे आहे अशातच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख,अध्यक्ष किरण नाईक,परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा ,राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन,अकोला जिल्हा अध्यक्ष शौकत अली मीर साहेब,सरचिटणीस प्रमोदजी लाजूरकर तसेच अकोला जिल्हा पत्रकार संघ समस्त पदाधिकारी यांनी कार्याची दखल घेत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ह्या महत्वाच्या पदाची धुरा निलेश जवकार यांच्याकडे सोपवली आहे.