वाडेगाव (डॉ शेख चांद)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग ता. बाळापुर जि अकोला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मानानिय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा अकोला डॉ. कांतआप्पा खोत व तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शना खाली मौजे सातारागाव येथे बी बी एफ ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राद्वारे सोयाबीन पिकाची लागवड सौ सुचिता अमोल मसणे यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय काळे व पर्यवेक्षक आर के धनभर यांनी बी बी एफ या पेरणी यंत्र तंत्रज्ञानाची माहिती दिली. कृषी सहाय्यक गोपाल राऊत, किरण दंदी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा बाळापुर यांनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणी चे अष्टसूत्री मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी १०० मिली पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी. शक्यतोवर घरच्या बियाण्याचा वापर करावा. बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. बीज प्रक्रिया करण्याकरीता बुरशीनाशक, किटकनाशक, राईझोबीअम + पी एस बी + ट्रायकोडर्मा हे घटक वापरून बीज प्रक्रिया करून बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. तसेच खोड किडी करिता थाईमेथॉक्झम ३० % एफ एस ची बीज प्रक्रिया करावी असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.