अकोला –आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत मात्र त्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदान लाभाचे चेक हवे असले तर ग्रामपंचायत लिपिक व सरपंच, उपसरपंच यांना कमिशन द्यावे लागते आणि ग्रामीण भागात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे मात्र आज लाच लुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात उपसरपंच, लिपिक आणि अभियंत्यासह 4 आरोपी अडकले आहेत.
व्यवसायाने शेत मजुर असणाऱ्या रा.खडकी टाकळी .येथील 42 वर्षे वय असलेल्या पुरुषांने केलेल्या तक्रारी वरून दिलीप दौलत सदांशीव, वय-52 वर्षे, व्यवसाय- उपसरपंच, खडकी टाकळी, पो सुकोडा, ता. जि.अकोला,अमित युवराज शिरसाट, वय-26 वर्ष, व्यवसाय- ग्रामीण गृह निर्माण अभियंता,( कंत्राटी)रा.आगर, ता जि अकोला, सुधीर मनतकार, वय- ३५ वर्षे, लिपिक, पंचायत समिती घरकुल विभाग, अकोला व योगेश अरुण शिरसाट, वय-29 वर्षे, व्यवसाय-रोजगार सेवक, रा. अमानतपूर पो. सुकोडा, ता. जि. अकोला या 4 ही आरोपींना दिनांक :- 21/6/2021 रोजी पडताळणी केल्यानंतर
आज दिनांक :- 22/6/2021 रोजी सापळा लावला असता उपसरपंच, खडकी टाकळी, पो सुकोडा, ता. जि.अकोला, यांना त्यांचे राहते घर आगर, ता. जि. अकोला येथे 2500/- रु लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरोपींनि तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसरा हप्त्याचा चेक काढण्यासाठी तक्रारदारास उपसरपंच यांनी 3000/- रु लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2500/- रु ची लाच स्वीकारल्याने तसेच त्यास प्रोत्साहन देऊन तडजोड घडवून आणली,
तसेच त्यास समर्थन दिले तसेच तक्रारदारास 2000/- रु लाचेची मागणी केल्याचे कारणावरून आरोपींना 1, 2 व 4 यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अध्यक्ष/सचिव छत्रपती शाहू महाराज, सुशिक्षित बेरोजगार संस्था म. वडवणी ता.वडवणी,जि बीड, ग्रामसभा, ग्रामपंचायत अमानतपुर,ता.जि. अकोला
विभागीय आयुक्त, अमरावती, .जिल्हाधिकारी, अकोला यांच्या सहकार्याने विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांचे मार्गदर्शन मध्ये अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती त्यांचे नेतृत्वाखाली .शरद मेमाणे ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अकोला, पोलीस अंमलदार अन्वर खान, संतोष दहीहंडे, अभय बावस्कर सर्व ला.प्र.वि.अकोला या पथकाने केली असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .या कारवाई मुळे ग्रामीण भागात भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे