कोरोनावर मात करुन मास्क सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या इस्राइलला मोठा झटका बसला आहे. इस्राइलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली असून कोरोना लस घेणारेच संक्रमित होत आहे. मागील महिन्यात इस्राइलने नागरिकांना मास्क न लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही लाट आली आहे.
इस्राइलने आपल्या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण केले होते. त्यानंतर इस्राइलने सर्व निर्बंध उठविले होते. त्यामध्ये मास्क काढण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर एक काही दिवसांतच कोरोना संक्रमणात वाढ होत होती. हा वेग मोठा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोरोनाचे म्युटेशन वाढत असून डेल्टा व्हेरिएंट हा खतरनाक व्हायरस लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमित झाला आहे. त्यामुळे आता तरुण आणि लहान मुलांचेही लसीकरण वेगाने करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
इस्राइलमध्ये या आठवड्याच्या सुरुवातील एका दिवसात १२५ नवे रूग्ण आढळले आहेत. एप्रिलनंतर ही सर्वाधिक संख्या मानली जाते. इस्राइलमध्ये सध्या १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. कोरोना संक्रमण रोखण्याठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध उठविल्यानंतर रँडम टेस्ट केल्यानंतर काही शाळांमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. तसेच लस घेतलेल्या नऊ शिक्षकांनाही लागण झाल्याचे समोर आले.
इस्राइलचे नवनिर्वाचित पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांनी वाढती रुग्णसंख्या पाहून नव्या लाटेची चिंता व्यक्त केली असून इशाराही दिला आहे. ते म्हणाले, ‘देशात पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता आहे. नवा डेल्टा व्हेरिएंट परदेशातून आलेल्या लोकांमुळे पसरत आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सक्तीने तपासणी केली जाणार आहे. सध्या संक्रमणाचा धोका असल्याने नागरिकांनी कमीत कमी प्रवास करावा.’