तेल्हारा(आनंद बोदडे)- तेल्हारा तहसिल येथे वंचीत बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याचे वतीने डॉ .बाळासाहेब आंबेडकर यांचे निर्देशानुसार पेट्रोल डिझल गॅस सह विविध वस्तुचे भाव वाढीच्या विरोधात निदर्शने करुन तहसिलदार डॉ.संतोष येवलीकर यांचे मार्फत केद्र व राज्य शासनाला निवेदन सदर करण्यात आले.
राज्यातील वाढती इंधन दरवाढ आणी गगनाला भिडनारी महागाई विरोधात वँचीत बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले जानसामान्याना होणारा ञास आणी लुटीची दखल घेवुन आंदोलनाची घोषना करण्यात आली त्यानुसार आज तहसिल कार्यालय तेल्हारा येथे आंदोलन करण्यात आले एकीकडे कोरोनाने जिव जात जाहेत आणी दुसरीकडे यातुन जे वाचले त्यांच जगन महागाईने असह्य केलय नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे आपण सर्वजन सध्या न भुतो न भविष्यती अशी महागाईची झळ झेलत आहोत या माहामारीत पोषक आहार घेवुन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे,त्यातच कित्येकांच्या होत्या त्या नोकऱ्याही गेल्या .त्यसाठी झोपलेल्या निर्दयी मोदी सरकार आणी आघाडी सरकारला जाग करण्यासाठी वंचींत हुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करुन निवेदन सादर करण्यात आले
यावेळी तालुका महासचिव अशोक दारोकार , प्रकाश खोब्रागडे, सुभाष रौ़दळे माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष , विकास पवार ,गोवर्धन पोहरकार , रोशन दारोकार , आनिल मोहोड ,अरविंद तिव्हाणे, आम्रपाली गवारगुरु , मंगेश वरठे, महीला आघडीच्या तालुका अध्यक्षा पदमा गवारगुरु , कल्पना हिवराळे, निलोफार शहा , मिलिंद वानखेड ,जिवन वानखडे, सुभाष भड, संघर्ष वानखेड सरपंच, नरेश बांगर,मधुसुधन बरिंगे. सुनिल बरिंगे, आ.सि.भोजने, सुरेंद्र भोजने पंजाबराव दुसेकर,रमेश सपकाळ , लखन सोनटक्के,संदिप कांबळे, संतोष हागे, पंकज व्यास ,श्रीकृष्ण वैतकार सरपंच, गोपाल,मोकळकार, अरुन वानखडे. वसुभाऊ कतोरे, सुज्ञान खंडेराव , गंगा बघ्घन , विना मोहोड , दिपमाला गवई नुसरत भाई ,धम्मपाल दारोकार, भगवान वानखडे, पञकार आनंद बोदडे , यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते