पातुर (सुनिल गाडगे) : येथील काशीद पुरा येथे गेल्या अनेक दीवसापासुन जुगाराचा क्लब चालु असल्याची माहीती पातुर पोलीसांना होती शनीवारी मध्य रात्री पातुर पोलीसांनी शेख परवेज शेख शकील यांच्या घरात जुगार चालु असतांना ठाणेदार हरीष गवळी यांच्या मार्गदर्शन खाली धाड टाकली असता सात आरोपी बावन पत्ते खेळताना आढळून आले.
तर त्याचा कडुन 7550 रुपायाचा मुध्दे माल जप्त करण्यात आला जुगार खेळतांना शेख मोहसीन शेख लाल , शेख नईम शेख लाल ,शेख रहेमान शेख गिलाणी , इजाज खाँन हमीद खाँन , शेख सुलतान शे बुरहान,मोहम्मद शफीक शेख करीम ,शेख परवेज शे ख शकीला सर्व रा पातुर यांच्या वर जुगार अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला