दिल्ली(Delhi) पोलिसांनी ४८ तासात एक मर्डर मिस्ट्री(Murder Mistry) सोडवली असून चार आरोपींना अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं आहे. दिल्लीच्या किशनगढ परिसरात ९ फेब्रुवारीला एका ३२ वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या (Women Murder) करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, हत्येमागे महिलेच्या प्रियकराचा (Boyfriend Killed Girlfriend) हात होता.
महिलेला आधी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर चाकूने तिचा गळा कापण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, महिला तिच्या पतीसोबत राहत होती आणि तिचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध (Extra Marrital Affair) होते. पण तिच्या प्रियकराला हे समजलं की महिलेचे आणखीही काही पुरूषांसोबत अनैतिक संबंध आहेत, तर त्याला हे सहन झालं नाही.
आरोपीने आधी महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या पतीला माहिती दिली. मात्र, घरात काही अडचणी सुरू असल्याने मृत महिलेच्या पतीने यावर कोणतही पाउल उचललं नाही. यामुळे नाराज झालेल्या आरोपीने तिची हत्या करण्याचा प्लॅन केला केला. ९ फेब्रुवारीच्या रात्री त्याने त्याच्या तीन मित्रांना सोबत घेऊन महिलेची गळा कापून हत्या केली.
आरोपीने ही पूर्ण घटना चोरीची वाटावी म्हणून तसे प्रयत्न केले. त्यानेच या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली तर समोर आलं की, या मर्डर मिस्ट्रीचा मास्टरमाइंड महिलेचा प्रियकरच आहे.
डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी या घटनेला चोरी घटना दाखवण्याचा प्रयत्न केला. रूममधून २ हजार रूपये आणि मृत महिलेचा मोबाइल घेऊन गेले. मास्टरमाइंड आरोपीने स्वत:ला मारझोड झाल्याचेही खोटे सांगितले. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी चाकू दूर पार्कमध्ये फेकला होता. तर ज्याने गळा दाबण्यात आला तो स्कार्फ जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्यावर खाकी हिसका दाखवल्यावर या मर्डर मिस्ट्रीचं रहस्य उलगडलं