तेल्हारा(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषद हि नेहमी चर्चेत असते अशातच न प चा नियोजनशून्य कारभार असल्याने या कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये काही वर्षांपूर्वी तुडगाव रोड लगत असलेल्या वस्तीमध्ये सांडपाण्याच्या नाल्यांचे काम करण्यात आले होते मात्र ठेकेदाराची मनमानी अन न प चा नियोजन शून्य कारभार यामुळे सांडपाणी येथील नागरिकांच्या घरात घुसून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता यावेळी येथील एका नागरिकाने वैतागून चक्क आपल्या घरच्यासह न प मध्ये आपला मुक्कम वढविला होता.यावेळी न प प्रशासनाने सदर सांडपाण्याची नाली पुन्हा दुरुस्त केली मात्र त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त अशी वेळ निर्माण झाली आहे. कारण रस्त्यापासून सदर नालीचे बांधकाम वरच्या बाजूला करण्यात आल्याने सदर गल्लीमध्ये गटारगंगा तयार झाली असल्याने अनेक संकटाना येथील नागरिकांना तोड द्यावे लागत आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने त्वरित या बाबी वर नियोजन न प प्रशासनाने करावे अशी मागणी होत आहे. सदर सांडपाण्याची नाली नागरिकांचा वापर आणि रस्त्यापेक्षा उंच केल्याने नाकापेक्षा मोती जड असे म्हणण्याची वेळ आली आहे.