सलग दुसर्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे मंगळवार (दि. 15) जूनपासून मराठी व इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत.
कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने शाळा सुरू करण्याबाबतचा संभ—म दूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 1 ली ते 8 वीपर्यंतच्या 1976 प्राथमिक शाळांमध्ये 1 लाख 65 विद्यार्थी, महापालिकेच्या 58 शाळांमध्ये 10 हजार 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिकच्या सुमारे 1050 शाळा असून 3 लाख 50 हजार विद्यार्थी आहेत. शाळा ऑनलाईन सुरू करण्याबाबत मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. सर्व शिक्षकांनी मुख्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन अध्यापन सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळणार नाहीत. जिल्ह्यात सीबीएसई माध्यमांच्या 1 ली ते 10 वी पर्यंतच्या सुमारे 44 तर बारावीच्या 7 शाळा आहेत. यात सुमारे 25 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार 15 जूनपासून पहिली ते आठवीपर्यंतचे ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत. 9 वी आणि 10 वीचे ऑनलाईन वर्ग 1 जूनपासून सुरू झाल्याचे सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
जिल्हा परिषद : प्राथमिक शाळा- 1976, विद्यार्थी संख्या – 1 लाख 65 हजार
महापालिका : प्राथमिक शाळा- 58, विद्यार्थी संख्या- 1 हजार 600
माध्यमिक शाळा : 1050, विद्यार्थी संख्या- 3 लाख 50 हजार
सीबीएसई शाळा : (1ली ते 12 वी) 51, विद्यार्थी संख्या- 25 हजारांहून अधिक.
शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे आदेश नाहीत. 15 तारेखपासून ऑनलाईन शाळा सुरू केल्या जातील. पहिल्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देतील. शासनाने शैक्षणिक फी संदर्भात धोरण ठरवावे.
– वसंतराव देशमुख, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ