अकोला,दि.13 – राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि. 14 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि. 14 रोजी सकाळी सव्वा दहा वाजता अमरावती येथुन मुर्तिजापूर येथे आगमन. सकाळी 10 वा. 20 मि.नी श्री.बापुजी देशमुख, व्यवस्थापक श्री. संत गाडगे बाबा गौरक्षण संस्था मुर्तिजापूर येथे सदिच्छा भेट, सकाळी 10 वा. 50 मि.नी कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापूर येथील गोडावुन व दुकानांचे उद्धाटन व लोकार्पण सोहळा. सकाळी साडेअकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. भैय्यासाहेब तिडके यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12 वा.5 मि.नी बांबल कृषी सेवा केंद्र, मुर्तिजापूर येथे सदिच्छा भेट व दुपारी 12 वा.25 मि.नी अकोलाकडे प्रयाण.
दुपारी 1 वा.20 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा.40 मि. नी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण व दुपारी पावनेदोन वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मौजे जांभा ता.मुर्तिजापूर येथील पुनर्वसित गावकऱ्यांना भुखंड वाटप. दुपारी 2 वा.20 मि.नी शिक्षण विभाग आढावा सभा, दुपारी 2 वा. 55मि. महानगरपालिकेशी संबंधित विविध विषयांवर आढावा सभा, दुपारी 3 वा.50मि. नी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक. दुपारी 4 वा.35 मि.नी दैनिक लोकमत मुख्य कार्यालय, अकोला येथे सदिच्छा भेट व दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. सवडीने कुरळपुर्णा मार्गे अमरावतीकडे प्रयाण.