अकोला – कोविड-19 ची तिसरी संभाव्य लाटेमध्ये बालकांसह कोरोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या व्यक्तीना संसर्ग होण्याचे शक्यता वर्तविण्यात आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधा, बेड, ऑक्सीजन, लसीकरण यासारख्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधिताना दिले.
जिल्हा नियोजन सभागृहात कोविड संदर्भांत महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, अभयसिंह मोहिते, तसेच सर्व तहसिलदार व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिल्या की, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तालुकानिहाय कोविडसंबंधी पुर्वतयारी करुन कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवा. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे कामे पूर्ण झाली असल्याचे खातरजमा करावी, बालकांसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर बेड राखीव ठेवावे. जिल्ह्यात संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी व बाजारपेठेत गर्दी होणार नाही याकरीता कडक उपाययोजना राबवा. तसेच 45 वर्षावरील प्रत्येक दुकानदार, विक्रेते, फेरीवाले व व्यापारांना लसीकरण अथवा चाचण्या केल्याचे खातजमा करा व लसीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्याना लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित करा. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांनाचा शोध घेऊन त्याना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
शासनाव्दारे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दि. 21 जून पासून लसीकरण मोहिम प्रारंभ होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण न झालेल्या व्यक्तीने 20 जूनपूर्वी लसीकरण पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.