सध्या सर्वच दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना निरनिराळ्या आणि आकर्षक ऑफर्स देत आहेत. Airtel, Reliance jio आणि Airtel सारख्या दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्लॅन्स ऑफर करत आहेत.
या तिन्ही कंपन्यांकडे १९९ रूपयांचा प्लॅन आहे. परंतु यात मिळणाऱ्या सुविधा मात्र निराळ्या आहेत. जर तुम्ही स्वस्त प्लॅनच्या शोधात आहात आणि तुम्हाला इंटरनेट, कॉलिंगची सुविधा हवी असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे.
रिलायन्स जिओचा १९९ रूपयांचा प्लॅन हा कंपनीच्या बेस्ट प्लॅन्सपैकी एक आहे. १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना२८ दिवसांची वैधता मिळते. तसंच यात दररोज १.५ जीबी प्रमाणे ४२जीबी डेटा देण्यात येतो.
यामध्ये सर्वच मोबाईल क्रमांकावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. यासोबतच दररोज १०० एसएमएसही मिळतात. याशिवाय कंपनी JioTV, JioCinema, आणि JioNews सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देते.
एअरटेलच्या १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओपेक्षा कमी डेटा आणि वैधता मिळते. एअरटेलच्या या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे. तसंच यात दररोज १ जीबी याप्रमाणे २४ जीबी डेटा मिळतो.
या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देण्यात येतात. याशिवाय कंपनी ग्राहकांना Prime Video मोबाईल ट्रायल, हॅलोट्यून्स, Wynk Music आणि Airtel Xstream चंदेखील सबस्क्रिप्शन देते.
Vodafone-Idea चा हा प्लॅन एअरटेलप्रमाणेच आहे. यामध्ये २४ दिवसांच्या वैधतेसह दररोज १ जीबी डेटा देण्यात येतो. या प्रमाणे ग्राहकांना २४ जीबी डेटा देण्यात येतो.
या प्लॅनसह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते. याशिवाय कंपनी Vi movies and TV basic चंही अॅक्सेस देते. या प्लॅनसोबत ग्राहकांना वीकेंड डेटा रोलओव्हर आणि फ्री नाईट डेटासारख्या सुविधा उपलब्ध नाहीत.