• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Pune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर

पुण्यात केमिकल बनवणाऱ्या कंपनीला लागलेली आग इतकी भयंकर होती की यामध्ये मृतांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केले जात आहेत.

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 2
0
Pune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर
15
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : पुण्यामध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये 18 निष्पापांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत (Pune Mulashi Fire) 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे. ही आग इतकी भीषण होती की या आगीत ज्या 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे DNA टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान या आगीमध्ये सापडल्याने मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं समोर आली आहेत, कंपनीकडून ही नाव देण्यात आली आहेत. अद्याप अठरावं नाव समोर आलेलं नाही.

मृतांची नावं- अर्चना कवाळे, सचिन घोडके, संगीता गोंदे, मंगल मरगळे, सुरेखा तुपे, सुमन फेबे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी आंबरे, मंदा कुलाट, त्रिशला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपाकर, सारीका कुडले, धनश्री शेलार. ही त्या 17 मृतांची नावं असून अद्याप एका व्यक्तीचं नाव समजलेलं नाही. त्याबाबत माहिती मिळवली जात आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली होती. याठिकाणी कंपनीत ज्वालाग्रही पदार्थ असल्यामुळे काही ठिकाणीही अद्यापही आग धुमसत आहे. कंपनीची इमारत आगीत जळून भस्मसात झाली असून घटनेच्या दुसऱ्या दिवशीही काही भागात आग धुमसत आहे. या कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 18 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 19 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत. तर धुमसणारी आग विझवण्यासाठीही एक अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुखही घटनास्थळी पोहोचले आहेत.

कंपनीतील पॅकिंग विभागात ही आग लागली होती, बंदिस्त खोलीत आग लागल्यामुळे कुणालाही बाहेर पडता आलं नाही. याठिकाणी आर एम वन पावडर ही ज्वालाग्राही पदार्थ असल्याने, त्यावर दाब पडून आग लागल्याचा अंदाज आहे. मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के याप्रकरणाची चौकशी करणार आहेत. शिवाय मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार, केंद्र सरकार तर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या हे मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून डीएनएच्या साहाय्याने ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोचणार आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी नऊ जणांची समिती आज चौकशी करणार असून आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आजच रिपोर्ट सोपवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

Tags: Pune fire
Previous Post

मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात

Next Post

मराठा आरक्षणासह विविध विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
मराठा आरक्षणासह विविध विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणासह विविध विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युपीए अध्यक्षपदावरून नवनीत राणांची प्रतिक्रिया, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द; खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.