अकोला (प्रतिनिधी ): अकोला महानगर पालिका प्रभाग क्र 9 मधील न्यू जोगळेकर प्लॉट मध्ये 6 लाख रु निधी खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या रस्ता बान्धकामा चा प्रारन्भ ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला, मनपा नगर सेवक मोहम्मद मुस्तफा यांनी मनपा कडून मंजूर केलेल्या विकास निधी ने या रस्त्याचे बान्धकाम केले जाणार आहे, प्रभाग मधील नागरिकाना रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण ह्या प्राथमिक सुविधा देणे गरजेचे आहे त्यासाठी नगर सेवक मोहम्मद मुस्तफा सतत प्रयत्न करीत असल्याबद्दल मिरसाहेब् यांनी त्यांची प्रशन्सा केली. 54 मिटर या रस्त्याचे बान्धकाम शिघ्र दर्जेदार काम करून पूर्ण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. न्यू जोगळेकर प्लॉट मधील या रस्त्याचे बान्धकामा साठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यापुर्वि 15 लाख रु व आमदार गोवर्धन शर्मा यांनी 5 लाख रु विकास निधी दिला होता परंतु केवळ 54 मिटर लान्बि चे बान्धकाम अपूर्ण राहिले होते. नगर सेवक मो मुस्तफा यांनी या अपूर्ण कामा साठी मनपा कडून 6 लाख 80 हजार रु निधी मंजूर करून घेतल्या मूळे आता या अपूर्ण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करन्याचे आश्वासन नगर सेवक मो मुस्तफा यांनी यावेळी दिले. या प्रसंगी एम आय एम चे महानगर्अध्यक्ष मुनाफ भाई, मो इलियास् खान, अ रेहमान् बाबू, जावेद् खान, कृषी व्यवसायि शेख साहेब, मो निसार, मो अतिक सर, मो नफिस् सर, राजिक् भाई, अशरफ् अली, मो जुनेद, मो शोएब, मो जावेद, मो अब्बास, देशमुख, व परिसरातिल् नागरिक व एम आय एम चे कार्यकर्ते उपस्थित होते.