मध्य प्रदेशच्या राजगढमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका ३५ वर्षीय महिलेने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. इतकं नाही तर महिलेच्या पती आणि सासू-सासऱ्यांनी मुलाच्या परिवाराला हे प्रकरण दाबण्यासाठी १ लाख रूपयांची मागणीही केली. जेव्हा मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला तर त्यांना खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या परिवाराला अटक केली आहे.
महिलेने दोन वेळा केलं मुलाचं लैंगिक शोषण
राजगढचे एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, महिलेने गावातच राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचं दोन वेळा लैंगिक शोषण केलं. जेव्हा याबाबत महिलेच्या परिवाराला खबर लागली तेव्हा महिलेचा पती आणि तिच्या सासू-सासऱ्यांनी २७ मे रोजी मुलाच्या परिवाराकडे १ लाख रूपयांची मागणी केली. मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा महिलेने आणि तिच्या परिवाराने मुलाला खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. (हे पण वाचा : डॉक्टरने न सांगता केला स्वत:च्या स्पर्मचा वापर, ४० वर्षांनी महिलेकडून नुकसान भरपाईची मागणी)
महिलेच्या परिवाराने मुलाच्या परिवारावर पैसे देण्यासाठी खूप दबाव टाकला. पण मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या पतीने आणि सासऱ्यांनी त्यांच्या शेतातील पपईची झाडे तोडली.
मुलाने केली तक्रार
महिला आणि तिच्या परिवाराच्या दबावाला वैतागून अल्पवयीन मुलाने राजगढ चाइल्ड लाइनमध्ये फोन करून या घटनेची माहिती दिली. चाइल्डलाइन राजगढचे काउन्सेलर मनीष दांगीने मुलाचं काउन्सेलिंग केलं आणि सोमवारी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
घटनेनंतर अल्पवयीन डिप्रेशनमध्ये…
काउन्सेलर दांगी म्हणाले की, या संपूर्ण घटनाक्रमानंतर अल्पवयीन मुलगा डिप्रेशनमध्ये होता. मुलाला भीती होती की, जर ही बाब सर्वांसमोर आली तर त्याची आणि त्याच्या परिवाराची बदनामी होईल. त्यामुळे त्याने लैंगिक शोषणाबाबत कुणालाच सांगितलं नव्हतं. पण जेव्हा महिलेच्या परिवाराने या घटनेवरून त्रास देण्यास सुरूवात केली तेव्हा त्याने हिंमत करून आम्हाला फोन केला. मुलगा आता ठीक आहे. आणि आम्ही त्याचं काउन्सेलिंग करत आहोत.