अकोला – जवाहर नवोदय विद्यालय चाचणी परीक्षा रविवार दि. १६ मे रोजी आयोजित केली होती. ती पुढे ढकलण्यात आली होती. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२१ ची संबंधित परीक्षेची सुधारीत तारीख उमेदवारांना वर्तमान पत्राच्या माध्यमातून किंवा www.navodaya.gov.in, https://navodaya.gov.in/nvs/en/Contact-Us/NVS-Hqrs/, www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AKOLA-en/home या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती नवोदय विद्यालय समिती, पुणे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक ७९०८८८३८३५, 8080418659, 9021165527, 9822236122, 9922941371 वर संपर्क करावा,असे आवाहन प्राचार्य कविता चव्हाण यांनी केले आहे.