तेल्हारा ( प्रतिनिधी): तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्हांयामध्ये वाढ झाली असून गेल्या दोन दीवसात तीघांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण तालुका या घटनानमुळे हादरला आहे पंचायत समीतीमधील कर्मचार्याच्या आत्महत्याच्या प्रकरणाला वेगळेच वळन घेतल्याने हत्या झाल्याचे नीष्पन झाल्याने अखेर रात्री उशीरा या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयती ताब्यात घेतले आहे !
प्राप्त माहीती नूसार तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत काल पंचायत समिति मधील शासकीय क्वार्टर मध्ये राहणारे पंचायत समिति मधील शिपाई सुरेश भोजने (५५) यांनी आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी शहरभर पसरली होती. त्यानंतर तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला असता त्या ठीकाणी अनेक संशयास्पद बाबी लक्षात आल्याने पत्रकार यांनी हत्या की आत्महत्या अशा मथळ्याखाली बातम्या प्रकाशीत केल्या.
या बातम्यांचा पोलीस विभागाने दखल घेत सदर मृतकाची बॉडीची अकोला येथे शवविच्छेदन केले त्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे नीष्पन झाले त्या नूसार मध्यरात्री दोघांना तेल्हारा पोलीसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून आरोपी वाढण्याची शक्यता असून आज दुपारी पत्रकार परीषद घेउन या प्रकरणाचा खुलासा करणार आहे. नेमका हा खून का करण्यात आला असा प्रश्न तालुका वासीयांना पडला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनीरीशक गणेश कायंदे करीत आहेत