• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

Model Rape Case: जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील 9 जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप; गुन्हा दाखल

Team by Team
June 1, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
83 2
0
jackie-bhagnani
31
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

बॉलिवूडची गायिका आणि माजी मॉडेलने (Rape on Bollywood model) हिंदी चित्रपटसृष्टीतील नऊ बड्या कलाकरांविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरची एक प्रत न्यूज18 कडे हाती लागली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी (Actor Jackky Bhagnani) आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन (Colston Julian) यांची नावं देखील आहेत. मॉडेलने प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनवर बलात्काराचा आरोप लावला आहे. तर जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांविरुद्ध छळ (Molestation) केल्याचा आरोप लावला आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कलम 376 (N), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित 28 वर्षीय मॉडेलने असा आरोप केला आहे की, आरोपींनी 2014 ते 2018 या चार वर्षांच्या काळात तिला अनेकवेळा लैंगिक त्रास दिला आहे. अभिनेता जॅकी भगनानी याने वांद्रे येथे मॉडेलचं लैंगिक शोषण केलं आहे. तर निखिल कामत यांनी सांताक्रूझमधील एका हॉटेलमध्ये तिचं शारीरिक शोषण केलं आहे. यासोबतच अन्य सात आरोपींमध्ये टी-सीरीजचे कृष्ण कुमार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचे सह-संस्थापक, अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरज्योत सिंग आणि विष्णू वर्धन इंदुरी यांचीही नावं आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनने माझ्यावर अनेकवेळा बलात्कार केला असल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. मॉडेलच्या मते, अभिनय क्षेत्रात करीयर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. पण चित्रपटांत भूमिका मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी तिचा अनेकदा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी केली आहे. परंतु याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं की, मॉडेलच्या तक्रारीनुसार, आम्ही सर्व आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (N), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व आरोपींची चौकशी करणार आहोत, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

Tags: crime newsjackie bhagnani
Previous Post

Se x Life : ‘या’ कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!

Next Post

दमदार प्रोसेसर आणि 5G सह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
Next Post
Realme X7 Max 5G

दमदार प्रोसेसर आणि 5G सह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Lemon

लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.