• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मराठा समाजाला केंद्राच्या ‘ईडब्ल्यूएस’मधून लाभ

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार
33
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये स्वतंत्र आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजातून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत असून, राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये केंद्र सरकारने खुल्या गटातील आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचे लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा आदेश सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे राज्य सरकारने 2018 च्या कायद्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकद‍ृष्ट्या मागास प्रवर्गात (एसईबीसी) दिलेले आरक्षण संपुष्टात आले आहे. मराठा समाजाला राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमध्ये मिळणारे आरक्षण तसेच शासकीय व निमसरकारी आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळाच्या भरतीत मिळणारे आरक्षण रद्द झाले. या निर्णयामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.

मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील राजकारण तापू लागले आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 6 जून, शिवराज्याभिषेक दिनापर्यंत पाच मुद्द्यांवर निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. तर भाजपचे मराठा नेते राज्याच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर निर्णयाचा दबाव वाढला आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. हा निर्णय या तारखेपासून लागू होणार आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या नोकर भरतीचा अंतिम निकाल लागला आहे; पण उमेदवारांना नियुक्‍तीपत्र दिले नसेल, तर अशावेळी हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. ज्या प्रकरणांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊन एसईबीसी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत त्यांना हा निर्णय लागू नसेल. त्यांच्या एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्या या सुरक्षित करण्यात आल्या आहेत. यापुढे अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता सर्व शैक्षणिक प्रवेश व नोकर भरतीसाठी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू राहणार आहे. या आरक्षणात मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गातील विविध जाती आणि धर्मियांना लाभ मिळणार आहेत.

Tags: Maratha Aarakshanmaratha reservation
Previous Post

Akola Vaccination Centers: उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

Next Post

ईसापुर ग्रामपंचायतीमध्ये अहील्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
ईसापुर ग्रामपंचायतीमध्ये अहील्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ईसापुर ग्रामपंचायतीमध्ये अहील्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

marriage

लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.