अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जिल्ह्याकरिता मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंधासह आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालय हॉल हे पुर्णतः बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात करावा. लग्नामध्ये मिरवणूक, बॅन्ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता केवळ २५ व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
व लग्न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशिररित्या पार पडणार नाही याची संबंधीत ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती यांनी दक्षता घ्यावी. व नियमानुसार त्यांचेवर कायदेशिर कारवाई करावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील.