• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, August 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मोठी बातमी-ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात नवीन नियमावली; काय सुरु काय बंद

City Reporter by City Reporter
May 31, 2021
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 2 mins read
91 1
0
Jitendra Papalkar
14
SHARES
656
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.३१- अकोला जिल्ह्यात कोविड रुग्‍णांचा पॉझीटीव्‍हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्‍धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्‍णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जिल्ह्याकरिता मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंधासह आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

राज्‍यातील कोविड-१९ च्‍या दुसऱ्या लाटेची स्थिती लक्षात घेता, राज्याचे मुख्य सचिव यांनी सुधारीत सुचना निर्गमित केल्‍या असुन त्यानुसार राज्यातील निर्बंधांचा कालावधी मंगळवार दि. १५ जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानिर्देशानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात आले.

हेही वाचा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

या आदेशात म्हटल्यानुसार,

Jump to section

2. ब) इतर निर्बंध

  • 1. अ.   निर्बंधासह सुरु ठेवण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक/ बिगर अत्‍यावश्‍यक सेवा.
  • 2. ब) इतर निर्बंध

१ . दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

२. दुपारी तीन वाजेनंतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पूर्णतः बंदी राहील.

३. सार्व‍जनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे पुर्णतः बंद राहतील. या बाबत महानगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबंधीतांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करावी.

४. सर्व केशकर्तनालय, सलुन, स्‍पा, ब्‍युटीपार्लर संपुर्णतः बंद राहतील.

५. शाळा महावद्यिालय, शैक्षणीक संस्‍था, प्रशिक्षण संस्‍था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्‍याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) जिल्‍हा परिषद अकोला यांची राहील.

६. सर्व प्रकारचे स्‍वागत समारंभ, मंगल कार्यालय हॉल हे पुर्णतः बंद राहतील. लग्‍न समारंभ करावयाचा असल्‍यास तो साध्‍या पद्धतीने घरगुती स्‍वरुपात करावा. लग्‍नामध्‍ये मिरवणूक, बॅन्‍ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्‍न समारंभाकरिता केवळ २५ व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍याची परवानगी असेल. व लग्‍न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्‍त चालणार नाही याची दक्षता घ्‍यावी. विवाह सोहळा बेकायदेशिररित्‍या पार पडणार नाही याची संबंधीत ग्रामस्‍तरीय कोरोना नियंत्रण समिती यांनी दक्षता घ्‍यावी. व नियमानुसार त्‍यांचेवर कायदेशिर कारवाई करावी. लग्‍न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण करण्‍याची जबाबदारी संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पोलीस ठाण्‍याचे प्रभारी अधिकारी यांची राहील.

७. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा, त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

८. मेडिकल स्‍टोअर्स व दवाखाने तसचे ऑनलाईन औषध सेवा २४ तास कालावधीत सुरू राहतील.

९. धान्‍य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्‍याचे दृष्‍टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.

– वृत्‍तपत्र वितरण संदर्भाने वाहतूक अनुज्ञेय राहील. त्‍यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

– सर्व पेट्रोलपंपावर या आदेशान्‍वये नमूद करण्‍यात आलेल्‍या परवानगी दिलेल्‍या बाबीकरिताच पेट्रोल वितरीत करण्‍यात यावे. मालवाहतूक, रुग्‍णवाहिका, शासकीय वाहने, अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने, प्रसार माध्‍यमाचे प्रतिनिधी यांचे करिता पेट्रोल डिझेल, व एलपीजी गॅस याची उपलब्‍धता करुन देण्‍याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , पोलीस विभाग यांनी दैनंदिन अहवाल जिल्‍हा प्रशासनास सादर करावा.

१०. गॅस एजन्‍सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत करण्‍यात यावे. पर‍ंतू ग्राहकांना गॅस एजन्‍सीमध्‍ये प्रत्‍यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्‍यास अथवा सिलेंडर घेण्‍यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्‍सी येथे ग्राहक आढळुन आल्‍यास संबधित एजन्‍सी कार्यवाहीस पात्र राहील. पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्‍हा पुरवठा अधिकारी, यांची राहील.

११. मद्य विक्री- नमूना FL-2 , Form E, Form E-2 व FLW-2 CL-3 या अनुज्ञप्‍तीतून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत मद्य विक्री करता येईल.

१२. कार्यालये- सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व आस्‍थापना या कालावधीत ही 25% कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील. वित्‍त व्‍यवसायाशी निगडीत सर्व कार्यालय यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरू ठेवायचे असल्‍यास ते केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवता येईल. आवश्‍यक कर्मचारी यांची संख्‍या कमी जास्‍त करण्‍याकरिता स्‍वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक राहील. तथापि, कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं., विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता ,विद्युत पुरवठा , महाराष्‍ट्र जिवन प्राधिकरण, धरण व्‍यवस्‍थापन पाटबंधारे, आरोग्‍य विभाग, महसूल प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत,कृषी विभाग, पशुसंवर्धन, जिल्‍हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना यांचेशी संबधित शासकीय, निमशासकीय विभाग/ कार्यालये ही सुरु राहतील.

१३. सर्व आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रे, आधार केन्‍द्र दोन वाजेपर्यंत सुरु राहील.

१४. उक्‍त कालावधीत नागरिकांसाठी दस्‍त नोंदणीचे कामकाज सुरु राहील.

१५. MIDC, उद्योग, कारखाने, सुतगिरणी येथे केवळ In-situ पध्‍दतीने कामकाज सुरू राहील. व्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र यांचेवर नियंत्रणाची जबाबदारी राहील.

१६. शासकीय यंत्रणामार्फत मान्‍सुन पुर्व विकास कामे आवश्‍यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबधित शासकीय यंत्रणांना या करीता वेगळ्या परवानगीची आवश्‍यकता नाही.

१७. आवश्यक नसलेल्या वस्तू ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. ई-कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरू राहतील. तसेच स्‍थानिक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरवणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्‍या घरी जातांना बिल व संबधित दुकानदारामार्फत देण्‍यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. संबधित कर्मचाऱ्यांना निगेटीव्‍ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. या अहवालाची वैधता ७ दिवसाकरीता असेल.

१८. दुरसंचार,टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्‍यादी सेवा सुरळीतपणे रहावी याकरिता सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्‍मक परिस्थितीमध्‍ये कामे करता येईल. संबंधीत आस्‍थापना यांनी त्‍यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

१९. धान्‍य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्‍याचे दृष्‍टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.

२०. वृत्‍तपत्र वितरण संदर्भाने वाहतूक अनुज्ञेय राहील. त्‍यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

२१. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने, यांची वाहतुक नागरीकांना अत्‍यावश्‍यक कामाकरिता फक्‍त अनुज्ञेय राहील. अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रूग्‍णाकरीता रिक्षा व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील.

२२. जिल्ह्याच्‍या मालवाहतूक व रुग्‍णवाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्‍वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापि मालवाहतूक शाखा, खत साठा इ.बाबतीत फक्‍त लोडींग व अनलोडींग करण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील. इतर कारणांकरिता व आवश्‍यक वैद्यकीय कारणांकरिता जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्‍यास, https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढून वाहतूक करता येईल.

२३. पावसाळ्यापूर्वी राष्‍ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण होण्‍याचे दृष्‍टीने केवळ In-situ पद्धतीने सुरू राहील.

२४. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबंधीत कामे सुरु राहतील.

२५. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, वृत्‍तपत्रांचे वितरण तसेच टीव्ही न्यूज चॅनल सुरु राहतील.

या सर्व निर्देशाचे काटेकारपणे अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, महसूल विभाग तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगरपालीका/ नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्‍याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. तसेच सर्व आस्‍थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्‍याकरिता त्रिसुत्री पद्धतीची अंमलबजावणी करावी. हे आदेश दि.१ जून चे सकाळी सात वाजेपासून ते दि.१५चे रात्री १२ वाजेपर्यंत लागु राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध्ज कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Jump to section

2. ब) इतर निर्बंध

  • 1. अ.   निर्बंधासह सुरु ठेवण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक/ बिगर अत्‍यावश्‍यक सेवा.
  • 2. ब) इतर निर्बंध
Page 2 of 2
Previous 12 Next
Tags: new rules akola dist
Previous Post

Akola Corona Cases: 113 पॉझिटीव्ह, 411 डिस्चार्ज, चार मृत्यू

Next Post

Akola Vaccination Centers: उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

RelatedPosts

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत
अकोला जिल्हा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

August 2, 2025
अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड
Featured

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

August 1, 2025
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
Featured

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

August 1, 2025
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Featured

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
अकोला
Featured

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

July 31, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
Featured

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
Next Post
vaccination center in akola

Akola Vaccination Centers: उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

मराठा समाजाला केंद्राच्या ‘ईडब्ल्यूएस’मधून लाभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

August 1, 2025
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

August 1, 2025
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.