अकोला, दि.३१- अकोला जिल्ह्यात कोविड रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जिल्ह्याकरिता मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंधासह आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
राज्यातील कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची स्थिती लक्षात घेता, राज्याचे मुख्य सचिव यांनी सुधारीत सुचना निर्गमित केल्या असुन त्यानुसार राज्यातील निर्बंधांचा कालावधी मंगळवार दि. १५ जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानिर्देशानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात आले.
या आदेशात म्हटल्यानुसार,
अ.क्र. | बाब | निश्चित करण्यात आलेली वेळ |
१ | सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्वस्त धान्य दुकाने | सकाळी सात ते दु. दोन |
२ | अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने / प्रतिष्ठाने | सकाळी सात ते दु. दोन
( सोमवार ते शुक्रवार ) शनिवार व रविवार पूर्णतः बंद |
३ | भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) | सकाळी सात ते दु. दोन |
४ | दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री ( डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी ) (घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील.) ( स्विटमार्टची दुकाने वगळता) | सकाळी सात ते दु. दोन
सायंकाळी पाच ते सात. |
५ | कृषी सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \ शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. | सकाळी सात ते दु. तीन
ग्रामपंचायत स्तरावर संबधित कृषी सेवक, तालुका स्तरावर तालुकाकृषी अधिकारी यांची राहील.जिल्ह्यात सदर प्रक्रियेचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , अकोला यांची राहील. |
६ | सर्व राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा,पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. | सकाळी दहा ते दु. तीन यावेळात सुरु राहतील.
(१००% उपस्थितीसह ) |
७ | पेट्रोलपंप/डीझेल/सीएनजी गॅस पंप | सकाळी सात ते दु. दोन
त्यानंतर दुपारी दोन ते रात्री आठ या कालावधीत शासकीय/ मालवाहतूक, अॅम्ब्युलंन्स इ. अत्यावश्यक वाहनांकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरीता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना |
८ | M.I.D.C. व राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल/ डिझेल पंप | नियमित वेळेनुसार |
९ | रेस्टॉरेन्ट , भोजनालय, उपहारगृह | सकाळी सात ते रात्री आठ वा.पर्यंत
फक्त होम डिलेव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी |
१० | कृषी उत्पन्न बाजार समिती | सकाळी सात ते दु. दोन |
११ | सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील.
वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल. |
नियमित वेळेनुसार |
१२ | शिवभोजन | वेळेनुसार |
१३ | अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील CSC Centers. | सकाळी नऊ ते दुपारी दोन. |