नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवं नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये पैसे काढण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आलं आहे. या नव्या नोटिफिकेशननुसार, बँकेकडून आता होम ब्राँच नसलेल्या इतर ब्राँचमधून रोख पैसे (Cash Withdrawal) काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसंच ग्राहक Non-Home ब्राँचमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत.
एका दिवसात काढता येणार 25000 रुपये –
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोना काळात आपल्या ग्राहकांसाठी SBI ने चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे Non-Home ब्राँचमधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता ग्राहक आपल्या जवळच्या ब्राँचमधून (Home Branch सोडून) एका दिवसांत आपल्या सेविंग अकाउंटमधून (Saving Account) 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.
To support our customers in this pandemic, SBI has increased the non-home cash withdrawal limits through cheque and withdrawal form.
#SBIAapkeSaath #StayStrongIndia #CashWithdrawal #Covid19 #BankSafe #StaySafe pic.twitter.com/t4AXY4Rzqh— State Bank of India (@TheOfficialSBI) May 29, 2021
चेकने काढता येणार 1 लाख रुपये –
चेकद्वारे Non-Home ब्राँचमधून कॅश काढण्याची मर्यादा 1 लाखांपर्यंत आहे. तसंच, थर्ड पार्टी अर्थात ज्याला चेक दिला आहे, त्यांच्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशननुसार, या नव्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असणार आहे.