शरीरसंबंध ठेवण्याबाबतील माणसाची विकृती कधी टोकाला जाईल सांगता येत नाही. या विकृतीतून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागते. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील थोरांदळे गावात घडली आहे. प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीवर मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. प्रेयसीने नकार देताच प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने तिच्या डोक्यात दगड घातला आणि हत्या केली. इतकंच नाही, गावच्या हद्दीत तिच्या मृतदेह टाकून धूम ठोकली.
सविस्तर वृत्त असं की, मृत महिला ही रांजणी या ठिकाणी बाजरीच्या पिकाचं राखण करण्यासाठी आली होती. तेव्हा आरोपीशी तिची ओळख झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमाच पडले. त्यानंतर प्रियकरांनं आपल्या प्रेयसीला म्हणजेच मृत महिलेला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी दबावही टाकला. मात्र, महिलेने मित्राशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीला राग आला. तो राग त्याने आपल्या मनात ठेवला.
मित्रासोबत शरीरसंबंध ठेवत नाही म्हणून आरोपीनं मित्राच्या साथीने प्रेयसीच्या डोक्यात दगड घातला आणि निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपींनी तिच्या मृतदेह आंबेगाव तालुत्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत टाकला आणि तेथून पसार झाले. गावातील नागरिकांनी महिलेचा मृतदेह पाहिल्यांनतर मंचर पोलिसांनी त्यांची माहिती दिली. सुनील बबन भुंताबरे आमि शिवनाथ गावबा, अशी आरोपींची नावं असून दोघेही जुन्नर तालुक्यातून मांजरवाडी गावातील रहिवासी आहेत.
मृत महिलेच्या आईने अज्ञाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आणि पोलिसांनी प्रियकरांसह मित्रालाही ताब्यात घेतले आहे. घोडेगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.