• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला : जिल्हाधिकारी पापळकर यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

Team by Team
May 28, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोला : जिल्हाधिकारी पापळकर यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद
13
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड १९ च्या उपचारामध्ये प्रारंभिक अवस्थेत संसर्ग लक्षात येणे व लवकरात लवकर उपचार सुरु होणे हा महत्त्वाचा भाग आहे, यामुळे आपण रुग्णांना गंभीर होण्यापासून तसेच मृत्यूपासुनही वाचवू शकतो, तरी ग्रामीण भागात आपली सेवा देणाऱ्या सर्व जनरल फिजिशियन्सने  कोरोना संसर्गाच्या प्रारंभिक अवस्थेतच रुग्ण शोधण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता फैलाव तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व म्युकरमायकोसिस या आजाराची वाढत असलेली रुग्णसंख्या याबाबत  आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या खाजगी जनरल फिजिशियन डॉक्टर्सशी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व तालुक्यातील डॉक्टर्स  ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            आज दिवसभरात  मुर्तिजापूर, बाळापूर,  अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी व अकोला या तालुक्यातील  डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार चव्हाण तसेच डॉ. सुरेश आसोले यांनी डॉक्टर्सना कोविड संदर्भात वापरावयाची उपचार पद्धती व उपचार अनुक्रमता याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, आपण ज्या भागात आपली सेवा देता त्या भागाला- गावाला कोरोनामुक्त करणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना प्रारंभिक अवस्थेतच चाचणीसाठी प्रवृत्त करावे. पेशंटचा अहवाल कोविड निगेटीव्ह असल्यास त्यावर पुढील उपचार करावे अन्यथा त्यास शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात पाठवावे. आपल्याकडे येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांची एक यादीही आपण स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अथवा आरोग्य यंत्रणेकडे देऊ शकता. त्याव्यक्तींचा स्थानिक पातळीवर पाठपुरावा करता येईल. या लवकर चाचणी व लवकर उपचार या पद्धतीचा अवलंब हा केवळ संसर्ग रोखण्यासाठी आहे.

ग्रामीसण भागात आता बरेच लोक जे कोविडचे उपचार घेऊन बरे होऊन परत गेले आहेत अशा लोकांवरही आपण स्थानिक पातळीवर म्युकर मायकोसिसच्या संसर्गाबाबत  लक्ष ठेवावे, त्यांना याबाबत समजावून सांगावे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व त्यात लहान बालकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका वर्तवण्यात आल्याने बालकांच्या आरोग्याकडेही आपण लक्ष द्यावे, त्यांच्या तपासण्या व लक्षणांतील बदल प्रशासनास तात्काळ कळवावे,असे आवाहन  जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

LIC मध्ये नोकरीची उत्तम संधी; असोसिएट पदांवर भरती, ९ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज

Next Post

मागासवर्गीय पदोन्नती मधील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मागासवर्गीय पदोन्नती मधील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फेत  निवेदन

मागासवर्गीय पदोन्नती मधील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार? मादी अस्वल मृत अवस्थेत नखे व दाताविना आढळले

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार? मादी अस्वल मृत अवस्थेत नखे व दाताविना आढळले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.