• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘हे’ १५ जिल्हे आहेत रेड झोनमध्ये! आताच काळजी घ्या अन्यथा कडक लॉकडाऊन

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
83 1
0
लॉकडाऊन
17
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, वाशिम, गडचिरोली आणि उस्मानाबाद आणि बुलडाणा हे 15 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर या निकषांवर या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. या जिल्ह्यांत एक जूननंतरही कडक लॉकडाऊन राहणार आहे. त्याचवेळी उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

राज्यव्यापी लॉकडाऊनची मुदत 1 जून रोजी सकाळी संपत असल्याने त्याबाबत येत्या पाच-सहा दिवसांत जिल्ह्यांचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतले जातील. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्या जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत 1 जूनला सकाळी 7 वाजता संपत आहे. गेला दीड महिना लॉकडाऊन असून आता लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्णसंख्या घटली आहे, त्या ठिकाणी ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत व्यवहार सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.

1 जूनपासून काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असल्याने अशा जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणता येणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, तेथे लॉकडाऊन शिथिल करण्यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा एका आठवड्यात आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना घरी क्वारंटाईन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तेथे कोव्हिड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी लोकल पुढील 15 दिवस सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असे ते म्हणाले.

आता धोका यलो फंगसचा

कोरोनाचे संकट असताना त्यात ब्लॅक फंगसचा आजार विळखा घालत आहे. त्यापाठोपाठ व्हाईट फंगसचा संसर्ग सुरू झाला. आता यलो फंगसचे नवे संकट येऊ पाहत आहे. उत्तर प्रदेशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा यलो फंगस अधिक धोकादायक असल्याने तज्ज्ञांनी सावध राहण्यास सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Tags: lockdown in maharahstra
Previous Post

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण नोंदणी ‘ऑन साईट’ होणार : केंद्र सरकार

Next Post

आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल व्यवसायांना मिळणार औद्योगिक दर्जा; उद्योगाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अर्ज आमंत्रित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
mtdc

आदरातिथ्य क्षेत्रातील हॉटेल व्यवसायांना मिळणार औद्योगिक दर्जा; उद्योगाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अर्ज आमंत्रित

करोना निर्बंधांचा भंग करून वाहतूक करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

करोना निर्बंधांचा भंग करून वाहतूक करणाऱ्या 40 ऑटो सह 60 वाहनांवर गुन्हे दाखल,शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.