ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात प्राईम नाऊ हे डिलिव्हरी ॲप बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. या ॲपमधून ग्राहकाला दोन तासात डिलिव्हरी देण्याची सेवा मिळत होती. मात्र आता ही सेवा बंद करण्यात आली असून ही सेवा अॅमेझॉनच्या मुख्य ॲपसह वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
भारत, जपान आणि सिंगापूर हे अॅमेझॉन प्राईमवरून अॅमेझॉन आणि वेबसाईटकडे वळाले आहेत. त्यामुळे प्राईम नाऊ हे ॲप बंद होत आहे.
मेन अॅप आणि वेबसाईटवर मिळणार सर्विस
कंपनीचा टू हॉव्हरर्स डिलीव्हरी ऑप्शन आता अॅमेझॉनच्या मेन अॅप आणि वेबसाईटवर मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत, जपान आणि सिंगापूरमध्ये प्राईम नाऊ अॅमेझॉनवर शिफ्ट केले आहे. त्यासोबतच प्राईम नाऊ ॲप आणि वेबसाईट बंद केली आहे. प्राईम नाऊ पहिल्यांदा २०१४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये लाँच करण्यात आले होते.
प्राईम नाऊ बंद केल्यानंतर आता अॅमेझॉन आपल्या थर्ड पार्टी पार्टनर्स आणि लोकल स्टोर्सला अॅमेझॉनसह जोडतील, अशी माहिती अॅमेझॉन ग्रॉसरी डिपार्टमेंटच्या उपाध्यक्ष स्टेफिनी लँड्री यांनी सांगितले.
प्राईम नाऊ बंद, पण जगभरात मिळणार सेवा
प्राईम नाऊमधून वेगवान डिलिव्हरीचा पर्याय असलेले गिफ्ट, टॉयज, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आदी वस्तू हे अॅमेझॉनमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही ही लँड्री यांनी सांगितले. ग्राहकांनी दोन तासांत डिलिव्हरी मिळू शकत असल्याचे अॅमेझॉन प्राईम नाऊ ॲपला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे नैसर्गिकपणे ही सेवा जगभरात देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान, अमेरिकेतील ग्राहक हे अलेक्सा शॉपिंगमधील वस्तू हे अॅमेझॉन फ्रेश किंवा व्होल फूड्स मार्केट शॉपिंग कार्टमध्ये जोडू शकणार आहेत.