• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार,मराठी पत्रकार परिषदेच्या श्रध्दांजली सभेत निर्णय

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 24, 2021
in Featured, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
87 1
0
राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार,मराठी पत्रकार परिषदेच्या श्रध्दांजली सभेत निर्णय
18
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोरोनानं राज्यातील १३५ पत्रकारांचं निधन झाल्यानंतरही राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपले गाऱ्हाणे घेऊन राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचा समारोप करताना देशमुख यांनी ही माहिती दिली.. सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारवरचा दबाव वाढविला पाहिजे असा आग़ह सर्वच वक्त्यांनी धरल्यानंतर राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची संयुक्त बैठक लवकरच मुंबईत बोलावण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले.. सरकार विरोधात न्यायालयात जावे अशा सूचना सातत्यानं केल्या जात आहेत त्याबाबतही वकिलांनी तसेच काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

राज्यातील पत्रकारांचे सातत्यानं बळी जात असताना देखील सरकार पत्रकारांच्या किरकोळ मागण्या देखील मंजूर करीत नाही याबद्दल सर्वच उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करीत सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आग्रह धरला.

टीव्हीजेए अध्यक्ष विनोद जगदाळे म्हणाले, फडणवीस सरकारने पत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायद्यासारखे काही महत्वाचे निर्णय घेतले मात्र विद्यमान सरकारने आपल्या कार्यकाळात पत्रकारांचा एकही प्रश्न सोडविला नाही हे संतापजनक आहे.. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांवर आड येणारे एक झारीतील शुक़चार्य नाही सारी झारीच शुक्रचार्यांनी भरली आहे.. पत्रकारांनी निधी उभारून गरजू पत्रकारांना मदत करावी अशी सूचना त्यांनी केली.. बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन यांनी बीयुजेच्यावतीने गरजू पत्रकारांना उपचारासाठी तर दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात असल्याचे सांगितले.

पत्रकार अत्यावश्यक सेवेत नाहीत आणि जीवनावश्यक सेवेतही नाहीत.. पत्रकारांना जाणीवपूर्वक टाळलं जात आहे, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासिन आणि दिशाहीन असल्याचा आरोप नवशक्तीचे संपादक नरेंद्र कोठेकर यांनी केला.

नवराष्ट्रचे संपादक राजा आदाटे यांनी पत्रकार संघटनांचा एक फ्रन्ट बनवून सरकारवर दबाव आणावा अशी सूचना केली. पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे अशी सूचना करीत जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी बारा मंत्र्यांनी पत्रं लिहिल्यानंतर देखील सरकार जर निर्णय घेत नसेल तर सरकार बहुमताची कदर करीत नाही असे म्हणावे लागेल असा हल्ला केला.. लोकशाही बहुमताचा आदर करणारी हवी अवहेलना करणारी नको असे मत त्यांनी व्यक्त केले . माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी, पत्रकार संघटनांनी आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र यावे आणि सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना केली. आजतकचे संपादक साहिल जोशी यांनी पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे यावर भर दिला. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला तर परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनीही सर्व संघटनांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेण्याची गरज विषद केली.

पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले. जान्हवी पाटील यांनी आभार मानले. बैठकीस परिषदेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हाध्यक्ष, परिषद प़तिनिधी असे ९० पत्रकार उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेली ही सभा नियोजनानुसार ठीक सहा वाजता सुरू झाली. ६ वाजून पाच मिनिटांनी सभेत उपस्थित असणारांनी तसेच राज्यातील पत्रकारांनी दोन मिनिटे उभे राहून दिवंगत पत्रकारांना तसेच ज्यांचे कुटुंबिय गेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Tags: JournalistsJournalists deaths due to coronavirusmarathi newsNana PatoleSharad Pawar
Previous Post

स्व.राजीवजी सातव यांना सर्व समाज बांधव, सर्वपक्षीय श्रद्धांजली व अस्थीकलशाचे घेतले दर्शन

Next Post

रेडझोन वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली शक्यता

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
विजय वडेट्टीवार यांनी रेडझोन वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची वर्तवली शक्यता

रेडझोन वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली शक्यता

ऑटोरिक्षा

रिक्षाचालकांचे अर्थसहाय्य थेट खात्यावर जमा होणार; ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचे कामकाज सुटीच्या दिवशीही राहणार सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.