• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

13 लग्न, १३ मुलांना फसवून लग्न करुन लुटणारी सोनू शिंदेची टोळी अटकेत

Our Media by Our Media
May 24, 2021
in गुन्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
88 1
0
13 लग्न, १३ मुलांना फसवून लग्न करुन लुटणारी सोनू शिंदेची टोळी अटकेत
33
SHARES
634
VIEWS
FBWhatsappTelegram

मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करुन घरातील पैसे व दागिने लुटून पळून जाणाऱ्या सोनू शिंदे या तरुणीला अखेरीस अटक करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये एका मुलाशी लग्न करुन त्याच्याकडून पैसे व दागिने घेऊन पळून गेलेल्या सोनूविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चौकशीदरम्यान सोनू ही एकटीच नसून तिच्यासोबत टोळीच असल्याचं समोर आलंय. ( Fake Marriage Gang arrested )

नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

सोनू शिंदे ही टोळी खरंतर हिंगोली आणि अकोला येथील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. यावेळी तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं आहे. हा सगळा प्रकार नेमका कसा उघड झाला, ही टोळी नेमकी कशी पकडली गेली, याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आतापर्यंत या टोळीने १३ जणांना फसवल्याचं समोर येतंय. हिंगोली आणि अकोला भागात सोनू शिंदेच्या टोळीने असेच प्रकार केल्याचं पोलिसांना चौकशीत समजलंय. वेगवेगळ्या शहरांतील मुलांना फसवून लग्न जुळवण्यासाठी ही टोळी शहरातील दलालांची मदत घ्यायची. दोन आठवड्यांपूर्वी सोनू शिंदेने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका तरुणाशी लग्न जुळवलं.

लग्न ठरल्यामुळे साहजिकच नवरदेव आनंदात होता. लग्नासाठी सोनू शिंदेच्या टोळीतील व्यक्तींनी मुलाकडच्या कुटुंबाकडे काही पैशांची मागणी केली. जी मागणी मुलाकडच्यांनी पूर्ण केली. परंतू लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सोनू घरात न नांदता पळून गेली आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. आपण फसवले गेलो आहेत हे कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

नंदुरबारच्या एका कुटुंबाला फसवलं

सोनू शिंदेने शाहदा येथील तरुणाकडून १ लाख ३० हजार रुपये घेत पोबारा केला होता. काही दिवसांनी या तरुणाच्या नातेवाईकाने तुझ्या पत्नीसारख्या दिसणाऱ्या एका मुलीचं लग्न बेटावद येथे कपिलेश्वर मंदीरात होत असल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोनूला अटक केली आहे. सोनू कपिलेश्वर मंदीरात सूरत येथे राहणाऱ्या सुनील पाटील या तरुणाशी लग्न करणार होती ज्याच्याकडून तिने दोन लाख उकळले होते.

पोलिसांनी सोनू शिंदेसोबत तिचे सहकारी रविंद्र गोपाळ, योगेश साठे, पूजा साळवे यांना अटक केली आहे. पोलीस कारवाईदरम्यान सोनू शिंदेची आई वंदनाबाई, भाऊ भैरव आणि बहिण प्रिती हे गाडीतून पळून गेले. पोलीस सध्या यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शाहदा पोलीस ठाण्यात सोनू शिंदे आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात ४९४, ४२०, ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Fake MarriageSonu Shinde
Previous Post

कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून वृद्धा दाम्पत्याला केली मारहाण

Next Post

जि.प.सदस्य संजुभाऊ अढाऊ यांच्या प्रयत्नातुन ईसापुर येथे पाणीटंचाई मधुन हातपंपाचे उदघाटन संपन्न

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जि.प.सदस्य संजुभाऊ अढाऊ यांच्या प्रयत्नातुन ईसापुर येथे पाणीटंचाई मधुन हातपंपाचे उदघाटन संपन्न

जि.प.सदस्य संजुभाऊ अढाऊ यांच्या प्रयत्नातुन ईसापुर येथे पाणीटंचाई मधुन हातपंपाचे उदघाटन संपन्न

अकोला पोलिसांनी तडीपार आरोपींसह अवैध धंद्यांविरोधात केली धडक कारवाई

अकोला पोलिसांनी तडीपार आरोपींसह अवैध धंद्यांविरोधात केली धडक कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.