अकोला,दि.23- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2138 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1876 अहवाल निगेटीव्ह तर 262 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ( Akola District Corona Update 23 May)
त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 146 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53755(40503+13075+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 262 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 146= एकूण पॉझिटीव्ह- 408.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 255406 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 252378 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2638 नमुने होते. आजपर्यंत एकूण 255236 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 214733 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
262 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 262 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 111 महिला व 151 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-32, अकोट-37, बाळापूर-13, तेल्हारा-25, बार्शी टाकळी-20, पातूर-16, अकोला-119. (अकोला ग्रामीण-30, अकोला मनपा क्षेत्र-89), दरम्यान काल (दि.22) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 146 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
615 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 40, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे चार, गोयंका हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील चार, संपुर्णा हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील चार, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 510 असे एकूण 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
सहा जणांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात,
गजरखेड आपातापा येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल केले होते.
कृषि नगर येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 61 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 27 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.
गीता नगर भागातील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 75 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6413 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53755(40503+13075+177) आहे. त्यात 1010 मृत झाले आहेत. तर 46332 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6413 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.