तेल्हारा- तेल्हारा शहरात व्यक्तिगत भांडणा वरुन वाद विकोपाला जात दोन समाजावर आला परिस्थिती हाता बाहेर जाताच विशेष पोलीस बल एस आर पी ला प्राचारण करण्यात आले मूळ हकीकत अशी की तेल्हारा येथील मोचिपुरा येथे रहिवाशी असलेले भावेश सुरेश सिसोदिया यांच्या जबानी रिपोर्ट नुसार आरोपी मोहसीन शाह,एजाज शाह,दानिश शाह,शहबाज शाह,शाहिद शाह,युसूफ शाह,गुलजमा शाह, समीर शाह,शब्बीर शाह, मोहसीन शाह याचा मित्र नाव माहीत नाही,शकील शाह,जाईद शाह,राजीक शाह असे एकूण 13 सर्व रा तेल्हारा यांनी दिनांक 21 मे ला 19.30 मिनिटांनी सर्व मिळून संगनमताने फिर्यादीला लाता बुक्याने मारहाण केली त्यात फिर्यादीची पत्नी पायल हिचा हात जोरात ओढुन थापड मारली व साली सपना पवार हिला, चु**की, छि**ल, तू बाहर निकल असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली तसेच शब्बीर शाह राजीक शाह, यांनी जातीवरून मोचाडल्या हो तुम कितने हो सात आठ घर है सब को आज दिखा देंगे असे म्हणून जातीवरुन शिवीगाळ केली यात भांडण सोडवण्यासाठी आलेले गल्लीतील देवानंद बायड,गणेश सिसोदिया, अप्पू सिसोदिया, विजय पवार, हे आले असता यांना सुद्धा लाथा बुक्यांनी मारहाण केली अश्या फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्या कलम सह 143,147,149,294,323,504,506 सहकलम 3 ( 1) आर,एस अंतर्गत तेल्हारा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तेल्हारा पोलिसां सह उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट हे करीत आहेत
फिर्यादी शकील शाह,वय 30 वर्ष रा तकीया तेल्हारा यांच्या जबानी रिपोर्ट वरून आरोपी सुरेश बाबूलाल सिसोदिया, विशाल सुरेश सिसोदिया, भावेश सुरेश सिसोदिया, राजेश मांगीलाल पवार,विजय मांगीलाल पवार,सर्व रा मोचिपुरा तेल्हारा यांनी 21 मेला 19 वाजून 15 मी,वाजता फिर्यादीच्या भावाचे पैसे आरोपी भावेश सिसोदिया वर होते त्या पैश्याच्या कारणावरून आरोपितांनी संगनमत करून गैर कायद्यानी मंडळी जमवून हातात पाईप घेऊन फिर्यादीच्या भावाचे घरात घुसून अश्लील शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केले यात आरोपी भावेश सिसोदिया याने फिर्यादीच्या भावांच्या पत्नीचा वाईट उद्देशाने हात धरून लोटून दिले व विनयभंग केला अश्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास तेल्हारा ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
प्रकरण शांतते साठी बोलावली सभा ,दोन्ही समाजाला समजविण्याचा पोलिसांचा प्रयत्न
तेल्हारा पोलीस स्टेशन ला दाखल गुन्हा रजिस्टर 231,232 ह्या हिंदू मुस्लिम समाजातील एकामेका विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट टी के काटे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची सभा घेण्यात आली यात मोची समाजाचे प्रतिष्ठित नागरिक तर मुस्लिम शाह समाजातील यांना बोलावून त्यांच्याशी संवाद घडलेल्या प्रकरणात चर्चा करण्यात आली यात दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी योग्य समनव्यातुन कुणीही धार्मिक पडसाद घडविणार नाही व समाजात अफवा पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही याची सर्वांनी ग्वाही दिली यावेळी शांतता कमिटीच्या सभे मध्ये तेल्हारा ठाणेदार नितीन देशमुख,पोलीस उपनिरीक्षक इतर पोलीस अधिकारी कर्मचारी,सह शहरातील प्रतिष्ठित द्यालसिह बलोदे,मनोहर चितलंगे,नगरसेवक गणी शाह,महेंद्र गोयनका,प्रेमचंद बायड,भवानी प्रताप देशमुख, मंगेश घोंगे, अनिल पोहणे,शेख अहेमद उर्फ पुंडा भाई,नगरसेवक अनुप मार्के,अन्सार पटेल,धर्मेश चौधरी, प्रशांत विखे,सुरेश शिगणारे,गजानन मुंजे,प्रदीप सोनटक्के,ऍड पवन शर्मा,निलेश खेट्टे, मनीष गोयनका,रवी शर्मा,अमित काकड,आदी नागरिक उपस्थित होते.
दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे आता आरोपीवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे नागरिकांनी शांतता कायदा सुव्यवस्था अबादीत ठेवण्यासाठी पोलिसांना सर्वांनी सहकार्य करावे.
टी के काटे
प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अकोट