अकोला: दि . २१ दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २१४१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८११ अहवाल निगेटीव्ह तर ३३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ५३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर १७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.२०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १७३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५२८२२ (३९८८३+१२७६२+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३३० + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १७३= एकूण पॉझिटीव्ह- ५०३.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २५०८२६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २४७८१९ फेरतपासणीचे ३९० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २६१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण २५०६३० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २१०७४७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
३३० पॉझिटिव्ह
दि . २१ दिवसभरात ३३० अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३३ महिला व १९७ पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-२८, अकोट-४३, बाळापूर-नऊ, तेल्हारा-३३, बार्शी टाकळी-७१, पातूर-११, अकोला-१३५. (अकोला ग्रामीण-२६, अकोला मनपा क्षेत्र-१०९). दरम्यान काल (दि.२०) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात १७३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
५३० जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि . २१ दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोल ॲक्सीडेंटर येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, जिल्हा परिषद भवन येथील दोन, गोयंका हॉस्पीटल येथील सात, थोटे हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर शेलोड येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ४२५ असे एकूण ५३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
१७ जणांचा मृत्यू
दरम्यान दि . २१ दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील सात जणांचा समावेश आहे. त्यात-
माळीपुरा येथील ४७ वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.१९ रोजी दाखल केले होते.
व्याळा ता. बाळापूर येथिल ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.
पिंपरी डिक्कर ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते.
चांगेफळ पैसाली ता. बार्शी टाकळी येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि.१६ रोजी दाखल केले होते.
तुकाराम हॉस्पिटल जवळीत ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१९ रोजी दाखल केले होते.
अकोट रोड येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.२० रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.
पातुर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१९ रोजी दाखल केले होते.
गोदरा ता. अकोला येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.२० रोजी दाखल केले होते.
कोलंबी येथील ७६ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथे दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
निमकर्दा ता. बाळापूर येथिल ३६ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल केले होते.
जठारपेठ येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.२० रोजी दाखल केले होते.
गोरेगाव येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१८ रोजी दाखल केले होते.
कोठारी वाटीका येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल केले होते.
व्यासनगर येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले होते.
तेल्हारा येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले होते.
सातव चौक येथील ३४ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
६६०८जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५२८२२ (३९८८३+१२७६२+१७७) आहे. त्यात ९९३ मृत झाले आहेत. तर ४५२२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६६०८ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.