• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

नंदुरबार: चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

Team by Team
May 19, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
80 0
0
rape
39
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

नंदुरबारमध्ये (Nandurbar) एका 40 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरकृत्य (Rape) केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Nandurbar police) या नराधमाला ताब्यात घेतले आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. अनिल आत्माराम गुरुबक्षाणी असं या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याचे किराणाचे दुकान आहे.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

या परिसरात राहणारी 5 वर्षीय चिमुरडी आरोपीच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आली होती.आरोपीच्या दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने तिच्या सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलगी घाबरून तिथून पळत घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत कुटुंबातील सदस्यांना सांगितली. आपल्या चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांना एकच हादरा बसला.

त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना उपनगर पोलीस स्टेशन गाठले. आणि नराधम अनिल गुरुबक्षाणी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्याविरोधात आयपीसी 370 व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधीत पीडितेची वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली असून आरोपीला देखील रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा अधिकचा तपास करत आहे.

दरम्यान, राजस्थानच्या जोधपूरमध्ये (jodhpur rajasthan) मुलीनेच स्वत:च्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद स्थितीत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीनं केला आहे. नात्याला काळिमा फासणारा नराधम वडील नेहमीच आपल्या मुलीला मद्यपान करून त्रास देत असे. सोमवारी रात्री तर त्यानं सर्व मर्यादा ओलांडत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे मुलीनं आपला बचाव करत असताना, हातात सापडलेल्या काठीनं थेट डोक्यावर वार केल्यानं तो निपचित जमिनीवर पडला आणि रक्तस्त्राव होऊ लागला. याप्रकारानं घाबरलेली मुलगी आपल्या आईजवळ परत जावून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर पाहिले असता वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं आहे.

Tags: crime newsrape cases
Previous Post

‘भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा’, काँग्रेसचा टोला

Next Post

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी

बलात्कार,ॲसीड हल्ला आणि बालकांवर अत्याचार करणा-याला होणार मृत्युदंडाची शिक्षा

मंत्रिमंडळ निर्णय : ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.