• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एकाचवेळी दोन बहिणींसोबत बांधली लग्नगाठ; हादरवणारं कारण आलं समोर, नवरदेवाला अटक

Team by Team
May 19, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
marriage
20
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

बंगळुरू : मुलीचा जन्म आणि तिचा विवाह (Marriage) या कारणांमुळे अगदी आजच्या युगातही ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना, त्यांच्या कुटुंबीयांना मुलगी एक ओझं वाटू लागते. त्यातूनच ते नको ते काही तरी करून बसतात. याचं उदाहरण देणारी आणि चित्रपटात शोभेल अशी एक घटना कर्नाटकातल्या (Karnataka) कोलार (Kolar) जिल्ह्यातल्या मल्बागल (Mulbagal) तालुक्यात नुकतीच घडली. तिथे 31 वर्षांच्या एका व्यक्तीने आपल्या नियोजित वधूसह तिच्या सख्ख्या, धाकट्या, अल्पवयीन बहिणीशीही विवाह केला. वधूनेच सातत्याने मागणी केल्यानं त्या व्यक्तीनं असा विवाह केला. मात्र रविवारी (16 मे) त्या वरासह त्याच्या सासरच्या मंडळींना पोलिसांनी अटक केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या घटनेचं वृत्त दिलं आहे.

मल्बागल तालुक्यातल्या वेगामदागू (Vegamadagu) गावातल्या सुप्रिया (21) हिच्याशी उमापती नावाच्या व्यक्तीचा विवाह ठरला होता. उमापती हा नात्याने सुप्रियाचा मामा लागतो. विवाहाच्या आधी काही दिवसांपासून सुप्रियाने उमापतीकडे मागणी केली, आपल्या 16 वर्षांच्या धाकट्या बहिणीशीही त्याने विवाह करावा. ती मूकबधिर (Deaf & Dumb) असल्याने तिचा विवाह होऊ शकणार नाही, अशी भीती तिला आणि तिच्या आई-वडिलांना वाटत होती. म्हणून उमापतीने तिचं म्हणणं मान्य केलं आणि सात मे रोजी या दोघी बहिणींशी त्याचा विवाह झाला. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास करून उमापती, त्याचे सासू-सासरे (म्हणजे मुलींचे आई-वडील) लग्नपत्रिका छापणारा प्रिंटर आणि विवाहविधी करणारे पुरोहित या सर्वांना ‘बालविवाह निर्बंध कायदा 2006’नुसार अटक केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, वेगामदागू गावातल्या व्यंकटस्वामी नावाच्या एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रियाचे वडील नागराजप्पा यांनीही दोघी बहिणींशी विवाह केले होते. सुब्बम्मा आणि रानेम्मा या बहिणींशी त्यांचा विवाह झाला होता. रानेम्मा मूक-बधिर असून त्यांना कोणीही मूलबाळ नाही. सुब्बम्मा यांना चार मुली असून त्यातल्या सर्वांत मोठ्या मुलीचं गेल्या वर्षी लग्न झालं. सर्वांत धाकटी मुलगी प्राथमिक शाळेत शिकते आहे. मधल्या दोन मुलींचा विवाह उमापती यांच्याशी करून देण्यात आला होता.

या घटनेचं वृत्त कळताच मुल्बागलमधले बालविकास प्रकल्प अधिकारी (Child Development Project Officer) रमेश यांनी गावाला भेट दिली. तेव्हा सुप्रिया तिच्या माहेरच्या गावाच्या जवळच्या गावातच असलेल्या सासरी होती. तिची धाकटी बहीण तिच्या माहेरी होती. धाकट्या मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि तिची इच्छा असेल, तर तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी पाठवलं जाईल. अन्यथा बालमंदिरात तिची सोय केली जाईल, असं रमेश यांनी सांगितलं.

Tags: crime news
Previous Post

कोरोना लढाईत किती आणि कसं महत्त्वाचं ठरू शकतं DRDO चं 2-DG शस्त्रं

Next Post

Buldana: मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Dam Dhanora

Buldana: मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

modi-vs-gadkari

'भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा', काँग्रेसचा टोला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.