हिवरखेड(धिरज बजाज)- अकोला वनविभाग चे उपवनसंरक्षक श्री के. आर. अर्जुना, सु. अ. वडोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने), वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) यांचे मार्गदर्शनाखाली, अकोट वन्यजीव क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बफर झोन क्षेत्रात असून सुद्धा क्षेत्राचा विचार न करता अकोट वर्तुळ क्षेत्रातील अजय एन. बावणे वन परिमंडळ अधिकारी अकोट वर्तुळ यांचे अधिनस्त वनकर्मचारी सी. एम. तायडे वनरक्षक बोर्डी बिट व ए. पी. श्रीनाथ वनरक्षक शहानुर, विकास मोरे, सोपान रेळे, राहुल बावणे, दीपक मेसरे, वनकर्मचारी अकोट वर्तुळ यांनी मिळून मौजा खंडाळा येथील शेतशिवारात वन्यप्रान्यामध्ये सुरू असलेल्या टक्कर मध्ये शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी लावण्यात आलेल्या ठिबक सिंचन च्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान दिले व मेळघाट बफर झोन क्षेत्रातील जंगलाच्या दिशेने सुखरूप सोडण्यात आले.