अकोला: केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या वाढविलेल्या दरांबाबत निषेध व्यक्त करून अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात ही भाववाढ कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दरवाढी विरुद्ध निदर्शने करण्यात आली.
पेट्रोल, डिझेलचे वाढलेले प्रचंड दर, अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटात सापडलेला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे व सततच्या लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे जीवनमान आधीच प्रचंड अडचणीचे बनलेले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर प्रति बॅग तब्बल 600 ते 700 रुपयांनी वाढविल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले गेले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने त्वरित रद्द करून पूर्वीच्या दरामध्ये किंवा त्यापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांनी पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून केली. जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करताना माजी आ. प्रा. तुकारामजी बिडकर, माजी आ. हरिदासजी भदे साहेब, माजी आ. बळीरामजी सिरस्कार साहेब, अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई राऊत यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या कोरोना बाबतच्या निर्बंधांचे पालन करून निदर्शने करण्यात आली. रासायनिक खतांच्या दरवाढीचा निषेध व्यक्त करून ही दरवाढ रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी महिला व विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस,ज़िल्हाध्यक्ष मा.संग्रामभैया गावंडे मा.आ. हरिदासजी भदे, मा.आ. बळीरामजी शिरस्कार, मा.आ.तुकारामभाऊ बिरकड, युवक ज़िल्हाध्यक्ष मा. शिवाभाऊ मोहोड, युवक महानगरध्यक्ष करन दोड विभागीय विद्यार्थी अध्यक्ष मा.अविनाश चव्हाण ज़िल्हामहासचिव परिमलभाऊ लहाने,ज़िल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा. दिनकरराव वाघ,कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा अश्वजित शीरसाट ज़िल्हाध्यक्ष असंघटित कामगार सेल मा.दिनकर निकम ,ज़िल्हामहासचिव मा. विद्याताई अंभोरे ,ज़िल्हाध्यक्ष महिला मा उज्वलाताई राऊत, ज़िल्हाध्यक्ष महिला OBC मा.सुषमाताई कावरे,महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा.अर्चनाताई थोरात, युवती ज़िल्हाध्यक्ष कल्पनाताई गवारगुरु , युवती महानगरध्यक्ष मेघना ताई पाचपोर, LGBT सेल अध्यक्ष किरण पवार,महिला ज़िल्हाउपाध्यक्ष सुनीताताई सांवले, महिला ज़िल्हासचिव शहनाज़दीदी , महिला ज़िल्हासदस्य वर्षा महाकाल, पिंटूभाऊ वानखेड़े ,मिलिंद गवाई,मोहन शेळके, गौरव गावंडे ,हर्षल ठाकरे , चेतन नलाखे, रामहरी आगड़े, भास्कर इंगळे, प्रद्युम्न लोनकर, संकेत जाधव , अक्षय भगेवार, यश साठरोठे,
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.