तेल्हारा (आनंद बोदडे)- तेल्हारा तालुक्यातील काळेगाव हे 600 लोकसंख्या असलेले छोटंसं गाव सर्व काही व्यवस्थित सुरू होत मात्र अचानकपणे गावातील कोरोनाने एक रुग्ण दगावल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले मात्र ग्रामपंचायत सदस्य संदीप गवई यांनी आपल्या गावात पून्हा कोरोना वाढू नये या विचाराने लक्ष देत तसेच विविध ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर लोकांना गर्दी करू नये माक्स चा वापर करावा सामाजिक अंतर ठेवावे व सम्पूर्ण गाव स्वछता ठेऊन आपले गाव सुरक्षित गाव ठेवावे मात्र अनेक ग्रामपंचायत ला आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसतो आहे त्यामुळे अनेक गावात ग्रामस्थ समोर येतात तर काही संस्था किंवा व्यक्तींना समोर यावे लागते आहे.
त्यातील एक अवलिया म्हणजे काळेगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप पंजाबराव गवई यांनी स्वखर्चाने सम्पूर्ण गाव सैनिटाईजर ने स्वच्छ केले आहे त्यांना 11 लिटर सैनिटाईजर त्यात लागले असून त्याचा खर्च त्यांनी स्वखर्चाने केला आहे गावात प्रत्यकाला ते विनंती करीत आहेत की विनाकारण घराबाहेर फिरू नका गावातच रहा आपली व कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटूंब कोरोना पासून संरक्षित करा त्यामुळे त्यांच्या या स्वच्छता अभियानाने सम्पूर्ण गाव स्वच्छ झाले असून त्याच्या या स्वछता कार्याचे कौतुक गाव सह परिसरात होत आहे