तेल्हारा (आनंद बोदडे)- वाण धरणाच्या डॅम वरुन ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईन गेलेली आहे त्याच पाईपलाईनवर तेल्हारा आणी हिवरखेड अकोटचा पाणीपुरवठा आहे सदर पाईपलाईन बरेच ठिकाणी लिकेज झाल्यामुळे जवळपास सात ठिकाणी या पाईप लाईनचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी आर ए. इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दोन दिवसात पुर्ण करण्यात आले आहे या कामकरीता पाच जे. शि.बी. मशीन पाच वेल्डींग मशीन सहा ट्रक ५०ते ६० कामगारांच्या साहाय्याने काम पुर्ण केले आहे
त्यामुळे ८४खेडी योजनेचा पाणीपुरवठा उद्या सुरळीत होणार आहे या पाईपलाईचे काम पुर्ण झाले आहे परंतु वाण धरणावरील काम बाकी होते ते सुध्दा राञी पुर्ण झाले असुन आज सकाळी ५.०० धरणातुन पाइपलाईनव्दारे पाणी सोडण्यात माञ पाईप लाईनने इयर पकडल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक दोन दिवस लागु शकतात असे महाराष्ट्र जिवन प्राधीकरणचे उपविभागीय अधिकारी आर.ए.इंगळे यांणी कळविले आहे