तेल्हारा (प्रतिनिधि)- तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात निघत आहेत अश्या ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचे लसीकरण घेण्यात यावे कारण उपकेंद्रावर लसीकरणची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे त्यामुळे सुरक्षीत अंतर ठेवणे शक्य होत नसल्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे अश्या ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण घेतल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व नियमाचे पालन सुध्दा होईल वैद्यकिय,अधिकारी दानापुर,यांणी सकारात्मक निर्णय घेतल्यास गाव तेथे लसीकरण शक्य होवु शकेल ईसापुर चे प्राथमीक आरोग्य केंद्र दानापुर असुन उपकेंद्र वाडीअदमपुर आहे वाडीअदमपुर येथे जाफ्रापुर ,वाकोडी या ठिकाणचे नागरीक मोठ्याप्रमाणात येत असल्याने ईसापुर येथिल नागरीक लसीकरणापासुन वंचीत राहत आहेत त्यामुळे ईसापुर येथे लसीकरण कॅम्प घेण्यात यावा अशी मागणी सरपंच मिराताई बोदडे यांणी तहसिलदार डॉ संतोष येवलीकर तालुका आरोग्य अधिकारी डा. चव्हाण यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे,