अकोला:अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराबरोबर आता ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातल्या सात ही तालुक्यातील सुमारे 54 गावांच्या सिमा सील करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश दिले आहेत. आजपासून १ जुनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी संबंधित उपविभागीय अधिकार्यांनी करण्याचे आदेश दिले आहेत.
शहराबरोबर आता ग्रामीण भागात देखील कोरोना संसर्ग वाढताना दिसतोय. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. छोटी छोटी घरे, ग्रामीण भागातील दाट वस्ती यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यांनी दहा पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असणार्या गावांमध्ये कोविड विषाणूचा प्रसार व फैलाव होऊ नये या करीता कडक निर्बंध लागू करण्याचे सुचविले होते
त्यानुसार ही 54 गावे प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषित करत त्या गावांच्या सिमा बंद करण्यात येत आहे. या गावात कडक निर्बंध लागू करण्यात येत असून तेथील सर्व व्यवहार बंद राहतील.
प्रतिबंधात्मक आदेश लावण्यात आलेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. यात सांगवी, म्हैसपूर, डोंगरगांव, उगवा, सुकोडा, वणी रंभापूर, बोरगांवमंजु, बोरगाव खु., सोनाळा, हिंगणी बु. रोहणा, सांगळूद बु. कोठारी व येळवण या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
तर अकोट तालुक्यातील 10 गावांमध्ये सुकळी, लोहारी, अटकळी, अकोलखेड, रुईखेड, बोर्डी, चोहट्टा, अकोला जहा., दिवठाणा व नांदखेड या गावांचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यातील 8 गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यात मनारखेड, मोरगांव सा., पळशी खु., हिंगणा, व्याळा, वाडेगांव, पारस व मानकी गावाचा समावेश आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील 6 गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यात तालुक्यात कातखेड, भेंडीमहल, खापाली, टेंभी, महान,खेर्डा खु. या गावांचा समावेश आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश असून यात सिरसो, मदापुरी, राजुरा सरोदे, दहातोंडा गावांचा समावेश आहे.
पातूर तालुक्यातील 7 गावांचा समावेश असून यात असोला,सुकळी, अंबाशी, सस्ती, विवरा, चोंढी, सायवणी या गावांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यातील 5 गावांमध्ये निंभोरा, बेलखेड, सौंदळा, हिवरखेड,वडगांव रोठे या गावांचा समावेश प्रतिबंधात्मक गावांमध्ये करण्यात आला आहे. या गावांमध्ये 1 जुन पर्यंत कडक निर्बंध जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लागू केले आहे.