हैदराबाद: कोरोना संसर्गाविरूद्ध रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ ची दुसरी खेप आज रविवार १६ मे रोजी हैदराबाद येथे आली. लवकरच देशात ‘स्पुटनिक व्ही ‘च्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. देशात सद्या मंद गतीने लसीकरण सुरु आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लसींच लसीकरण सुरु आहे.
आज स्पुटनिक व्ही लसीचा दुसरी खेप देशाच पोहचली आहे. यावेळी भारतातील रशियन राजदूत निकोले कुडाशिव उपस्थित होते. ते म्हणाले, रशिया आणि भारत कोविड विरुध्दची लढाई एकत्र येऊन लढत आहेत हे पाहून आम्हाला आनंद होत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेमध्ये हातभार लावण्यासाठी ‘स्पुटनिक व्ही’ ही भारतात वापरली जाणारी पहिली परदेशी निर्मित लस बनली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसची पहिली खेप १ मे २०२१ रोजी भारतात आली. १४ मे रोजी शुक्रवारी हैदराबादमध्ये स्पुटनिक व्ही लसीकरण सुरू झाले आहे.
भारतात स्पुटनिक व्ही लसची किंमत किती असेल
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माहितीनुसार आयात लसीचा एक डोसची किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी म्हणजे ९९५ रुपये ४० पैसे असेल. यामध्ये लस टोचून घेण्याच्या किंमतीचा समावेश नाही.
ही किंमत खाली येईल अशी काही आशा आहे का?
डॉ. रेड्डी व्यतिरिक्त आरडीआयएफने हेटरो बायोफर्मा, ग्लॅन्ड फार्मा, पनाका बायोटेक, स्टेलिस बायोफर्मा अशा अनेक भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. या सर्व कंपन्या एकत्रितपणे ८५ कोटींहून अधिक डोस तयार करतील. डॉ. रेड्डीज म्हणाले आहेत की जेव्हा भारतात ही लस बनविणे सुरू होईल तेव्हा किंमत कमी होऊ शकते.
स्पुटनिक व्ही भारतात कधी उपलब्ध होईल?
रशियाकडून दीड लाखांच्या डोसची पहिली खेप १ मे रोजी भारतात पोहोचली. दुसरी खेप आज पोहोचली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांच्या मते पुढील आठवड्यापासून ही लस भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकते.