बोर्डी(देवानंद खिरकर )- अकोलखेड येथिल पठार व खाई नदी पात्रात असलेल्या वेगवेगळ्या 5 ते 6 ठीकाणी अंदाजे 12 ब्रास रेती कोणीतरी चोरट्याने विनापरवाना उत्खनन करून काढून गाळुन ठेवलेली रेती पंचासमक्ष आढळून आली.सदर रेती जप्त करुन वीटभट्या वरील मजुराच्या सहायाने प्रत्यक्ष मोक्यावर दगड़ा मधे फैलुन नष्ट करण्यात आली.योग्य कायदेशिर विल्हेवाट लावण्या करिता अथवा सुरक्षित ठीकाणी नेण्या करीता साधन सामग्री ऊपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांना नेता येऊ नये.म्हणून पंचासमक्ष नीरपयोगी करण्यात आली.सदरची कारवाई अकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे,तहसीलदार निलेश मडके,नायब तहसीलदार हरिष गुरव,यांच्या मार्गदर्शनाखाली नीळकंठ नेमाडे मंडळ अधिकारी,तलाठी अनिल रावणकर,कोतवाल नारायण तायडे,वीटभट्टी मालक पंच 1)शेख चंद शेख हुसैन 2) अ.नहीम अ.रहीम रा.अकोलखेड आणि त्यांचे कामावरील मजुरांची मदत घेऊन रेती साठे ऊध्वस्त करण्यात आले आहे.