तेल्हारा(प्रतिनिधी) :- तेल्हारा ,बेलखेड़ ते हिवरखेड़ रस्ता विनाविलंब सुरु करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होती परंतु रस्ता दर्जेदार सुरू करण्यापूर्वीच रस्त्यावर पिवड़ी माती टाकून कामात ग़ैरप्रकार होत असल्या बाबत ची तक्रार बेलखेड़ येथील नागरिकांनी तहसीलदार तेल्हारा यांच्याशी संपर्क साधून केली.
तेल्हारा ,बेलखेड़ ते हिवरखेड़ रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यान पासून स्थगित असून अर्धवट झालेल्या कामामुळे या रस्त्यावर मोठ मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला , रस्त्यावर टाकन्यात येत असलेल्या पिवळया मातीमुळे सर्वत्र धूळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वाहन धारकाना अनेक समस्यांना तोड़ दयावे लागत आहे या रस्त्याकड़े , शासन ,प्रशासन , अधिकारी , लोकप्रतिनिधि सह कुणाचेच लश नाही ,नागरिकांन कडून रस्त्याचे काम लवकर सुरु व्हावे व दर्जेदार व्हावे याकरीता अनेक वेळा आंदोलने करण्यात आली परंतु काहीही उपयोग झाला नाही एक वर्षा नंतर आता पुन्हा सदर रस्त्यावर पिवड़ी माती टाकन्यात येत आहे त्यामुळे रस्त्याचा दर्जा तर घसरनारच , उन्हाळ्यात व हिवाळयात धुळीचे साम्राज्य व पावसाळ्यात चिखल यामुळे रस्त्यावर चालने मुश्किल झाले आहे धुळी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .तरी रस्त्यावर टाकन्यात आलेली पिवड़ी माति काढून टाकन्यात यावी व रसत्याचे काम दर्जेदार करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार तेल्हारा यांच्याकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तक्रार करण्यात आली आहे.
बेलखेड येथील नागरिकांनी संपर्क साधून रस्त्यावर पिवळी माती टाकण्याबाबत सांगितले आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पिवळी माती टाकण्याबाबत विचारना करुन माती टाकण्याचे काम थांबवण्याची सांगितले आहेत.
डॉ . संतोष येवलीकर
तहसीलदार तेल्हारा