अकोला (प्रतिनिधी )- वारी हनुमान ( Wari Hanuman) येथून पाणी पुरवठा करणाऱ्या हिवरखेड – अडगाव नजीकची मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीच्या कारणास्तव 84 खेडी योजनेसह अकोट तेल्हारा शहराचा पाणीपुरवठा दि.17 ते 20 मे असा 4 दिवस बंद राहनार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात चार दिवस पुरेल एवढा जलसाठा कसा करून ठेवावा याची चिंता शहरवासीयांना सतावत आहे. ( Wari Hanuman to Akot Water Pipeline Leakage )
तालुक्यातील वारी हनुमान येथील वान धरणातून 84 खेडी पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली मुख्य पाईपलाईन हिवरखेड अडगाव नजिक लिकेज झालेली आहे.तिच्या दुरुस्तीचे काम दि.17 मे सोमवार पासून सुरू होणार आहे.याचं पाईपलाईन ला अकोट तेल्हारा शहराला पाणी पुरवठा करणारी लाईन जोडलेली असल्याने शहराचा पाणीपुरवठा सुद्धा दि.17 ते 20 मे अशा 4 दिवसाकाठी बंद राहणार आहे.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात चार दिवस पुरेल एवढा जलसाठा कसा करून ठेवावा असा प्रश्न शरवासीयांना पडला आहे.
चार दिवस पुरेल एवढा जलसाठा करण्यासाठी अनेक नागरिकांनी बिछायात केंद्रावरून भाड्याने टाक्या घेतल्याचे दिसून आले असून अनेकांनी तर चक्क एक हजार ते तीन हजार लिटर पर्यंतच्या नवीन टाक्या विकत घेतल्या. त्यामुळे लॉक डाउन च्या काळात सर्वच व्यवसाय बंद असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.