अकोट (शिवा मगर)- अकोट महाराष्ट्र शासनाने आणखी लॉक डाऊन चे निर्बंध कडक करून संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या येणाऱ्या जाणाऱ्या ची कसून तपासणी चालू झाली.अश्यातच अकोट अंजनगाव महामार्ग वर अमरावती जिल्ह्याचे सीमेवर रुईखेड येथे अकोट ग्रामीण पोलिस चेक पोस्ट येथे आज कडक उन्हांमध्ये मध्यप्रदेश कडे पायी जाणारे मजुरांना अकोट ग्रामीण पोलिस विकास गोलोकार व त्यांचे सहकारी यांनी लॉकडाऊन काळात आपला सामाजिक बांधिलकी दाखवत पायी जाणाऱ्या मजुरांना नाष्टा,चहाची सोय लावून दिली.
तसेच त्यांना समोर जाण्याची सोय लावून दिली व आर्थिक मदत म्हणून १ हजार रुपये अशी मदत करून अशा कठीण परिस्थितीत खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. आपले कर्तव्य पार पाडले.यापूर्वीही अनेक वेळा अकोला पोलिसांनी निराधारांना मदत , एका गरीब कुटुंबाला घर धान्य मदत, गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत केली, तर अनेक गरजवंत रुग्णांना मोफत औषधोपचार याचा खर्च,स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आदी पोलिसांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यांचे कार्याचे परिसर मध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.