• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

धक्कादायक! सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या

Team by Team
May 14, 2021
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
16
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

जैसलमेर : कोरोना महामारीने जगाला मोठा धडा दिला आहे. माणुसकी, नाती जपण्याचा संदेश दिला आहे. मात्र या संकटात गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिली आहे. लोकांना अजूनही नात्याची किंमत कळली नसल्याचे राजस्थानातून एका घटनेवरून उजेडात आले आहे. नात्याला कलंक लावणारी घटना राजस्थानच्या जैसलमेर शहरात घडली आहे. आपल्या सूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने आपल्या तरुण मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मागील 15 दिवस कुणालाच मागमूस लागलेला नाही. सून आणि सासऱ्याने दोघांनी मिळून केलेल्या हत्याकांडाने राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात बुधवारी या घटनेचा खुलासा झाला. (The father killed his son as he did not want to interfere in his immoral relationship with his daughter-in-law)

वाचा : ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; कोरोनाग्रस्त पित्याचे प्राण वाचवण्यासाठी हतबल तरुणीचा शेजाऱ्याकडून गैरफायदा

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

काय म्हणाले पोलीस?
पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या पुरुषाच्या पत्नीने पतीला लिंबू सरबत दिले होते. त्या सरबतमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. नंतर दोघांनी करंट लावून हत्याकांड केले. मुलाला विजेचा धक्का लागला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपी सासऱ्याने सर्वांना सांगितले. पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी अधिक तपास सुरू केला. या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. नाचना पोलिस डीसीपी हुकुमार राम बिष्णोई यांनी या हत्याकांडाबाबत विस्ताराने माहिती दिली. तरुणाच्या हत्येचा त्याची पत्नी आणि पित्याने पद्धतशीर कट रचला होता. तरुणाला रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा सरबत दिले. त्यात टाकलेल्या झोपेच्या गोळ्यांमुळे तरुण बेशुद्ध झाला. तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर दोघांनी विजेचा करंट लावला. आरोपी सासऱ्याने आपल्या मुलाला कायमची झोप दिली. नंतर आपले गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी सकाळी-सकाळीच मुलाचे अंत्यसंस्कार केले.

अशी उलगडली हत्या
हिरालाल असे मृत तरुणाचे नाव आहे. हिरालालच्या मृत्यूबाबत संशय आल्यानंतर त्याच्या छोट्या भावाने वहिनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. या तपासासाठी पोलिसांनी दफन केलेला मृतदेह दहा दिवसांनंतर कबरमधून बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पुढे पाठवण्यात आला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हिरालालच्या मृत्यूमागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला. त्याआधारे पोलिसांनी हिरालालच्या पत्नीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली. तिने हत्याकांडामागील कारणाचा पोलिसांसमोर खुलासा केला. आरोपी महिलेचे तिच्या सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. यात हिरालालचा अडथळा येत होता. त्यामुळे सूनेसोबतच्या संबंधातील मुलाचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी हिरालालच्या हत्येचा कट रचला गेला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. (The father killed his son as he did not want to interfere in his immoral relationship with his daughter-in-law)

Tags: crime news
Previous Post

ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; कोरोनाग्रस्त पित्याचे प्राण वाचवण्यासाठी हतबल तरुणीचा शेजाऱ्याकडून गैरफायदा

Next Post

आता महाराष्ट्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी सक्तीची

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
lockdown 4.0

आता महाराष्ट्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी सक्तीची

Rape crime

फेसबुकवरील मैत्रीनं केला घात! लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; 2 लाखांचा घातला गंडा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.