• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

पत्नीचा राहत्या घरी गळफास, पतीचीही ऑफिसमध्ये आत्महत्या, लग्नानंतर चार महिन्यात टोकाचं पाऊल

Team by Team
May 13, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
suicide
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमध्ये समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणीने घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर कार्यालयात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात नवदाम्पत्याची अखेर झाली. दोघांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. (Ahmednagar Crime News Jamkhed Wife Commits Suicide at Home Husband Hangs himself in Office)

चार महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 28 वर्षीय शिल्पा आणि 32 वर्षीय अजय कचरदास जाधव यांचा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील बीड रोडवर आदित्य गार्डन शेजारी जाधव दाम्पत्य राहत होते.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचाही गळफास

शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी अजयला समजली. या घटनेमुळे अजयला मोठा धक्का बसला. काही तासातच त्यानेही मोरे वस्तीमधील पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

पतीची सुसाईड नोट सापडली

अजयने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला मी जबाबदार असून कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. (Ahmednagar Crime News Wife Suicide Husband Hangs himself)

दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी

अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. अजय आणि शिल्पा यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags: crime newssuicide news
Previous Post

25 हजारात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 3 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

Next Post

धक्कादायक! कपडे वाळत घालण्यावरून तुफान धुलाई, एकीचा मृत्यू

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
अकोट तालुक्यात शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या

धक्कादायक! कपडे वाळत घालण्यावरून तुफान धुलाई, एकीचा मृत्यू

PM Kisan

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2 हजार रुपये, केंद्राकडून तब्बल 19 हजार कोटी रुपये जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.