• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

वर्ध्यात डबीत सापडला मुघलकालीन खजिना; घरात खोदकामावेळी सापडलं नाण्यांसह 4 किलो सोनं

Team by Team
May 12, 2021
in विदर्भ
Reading Time: 1 min read
80 1
0
वर्ध्यात डबीत सापडला मुघलकालीन खजिना; घरात खोदकामावेळी सापडलं नाण्यांसह 4 किलो सोनं
23
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

वर्धा: वर्ध्यातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम करत असताना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह 4 किलो 28 ग्रॅम सोनं होतं. त्यात सोन्याचं बिस्किटही आढळून आलं. मुघलकालीन सोनं घरात सापडल्याची वार्ता कळल्यानंतर नाचणगाव येथे बघ्यांची एकच झुंबड उडाली. या घटनेचं वृत्त समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन हे सोनं ताब्यात घेतलं आहे. (historical gold coins worth Rs 20.54 lakh found in Maharashtra’s wardha)

वर्ध्याच्या नाचणगाव येथे शेतकरी सतीश चांदोरे यांनी जुने घर विकत घेतले होते. जुन्या घराचं खोदकाम त्यांनी सुरू केले. खोदकामातील मातीचा ढिगारा शेतात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान हा ढिगाराही साफ करण्यात आला. हा कचरा साफ करताना मजुरांना एक डबी कचऱ्यात सापडली. डबीमध्ये सोनं आढळून आलं. त्यात एक सोन्याचं बिस्कीट आणि मुघलकालीन नाणे, कानातील रिंग असे एकूण 9 आभूषणे सापडली. 4 किलो 28 ग्रॅम वजनाचं हे सोनं असून त्याची आजची किंमत 20 लाख 54 हजार इतकी आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हे सोन ताब्यात घेतलं. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शेतकऱ्याने सोनं घेताच, मजुरांची पोलिसांत धाव

शेतात सोनं सापडल्याची माहिती मिळताच शेतकरी चांदोरे याने मजुरांकडून हे सोने स्वतःकडे घेतले होते. परंतु, मजुरांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांना माहिती मिळताच शेतकऱ्याला गाठण्यात आले आणि सोने ताब्यात घेण्यात आले. मुघलकालीन नाणी यात सापडली असल्याने पुलगाव शहराच्या इतिहासाबाबत नवीन माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही नाणी इथे कशी आली? मुघलकाळातील कोणत्या राजाच्या काळातील ही नाणी आहे? त्या मागचा इतिहास काय आहे? आदींचा अभ्यास करण्यात पुरातत्व विभागाला मदत होणार असल्याचं रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, सोन्याचं घबाड सापडल्याने पंचक्रोशीत चर्चांना एकच उधाण आलं असून सोनं पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकजण नाचणगाव गाठताना दिसत आहेत. (historical gold coins worth Rs 20.54 lakh found in Maharashtra’s wardha)

Tags: Historical Gold
Previous Post

अलर्ट! 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण

Next Post

कोरोनावर देशी दारुचा काढा गुणकरी ठरत असल्याचा दावा, डॉक्टरची देशात चर्चा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कोरोनावर देशी दारुचा काढा गुणकरी ठरत असल्याचा दावा, डॉक्टरची देशात चर्चा

कोरोनावर देशी दारुचा काढा गुणकरी ठरत असल्याचा दावा, डॉक्टरची देशात चर्चा

crime murder

12 वर्षीय चिमुरड्यानं धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.